Radhe Shyam Release Date
Radhe Shyam Release Date esakal
मनोरंजन

प्रभासचा Radhe Shyam चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

सकाळ डिजिटल टीम

एसएस राजामौलीच्या 'आरआरआर' या चित्रपटाची तारीखही पुढे ढकलण्यात आलीय.

साऊथ सुपरस्टार प्रभास (South Superstar Prabhas) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) यांचा मोस्ट अवेटेड 'राधे श्याम' (Radhe Shyam) हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अंतिम तारीख आता समोर आलीय. यापूर्वी हा चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित होणार होता; पण कोरोनाच्या महामारीमुळं निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली. आता प्रभासचा 'राधे श्याम' चित्रपट 11 मार्च 2022 रोजी (Radhe Shyam Release Date) प्रदर्शित होणार असून हा चित्रपट 5 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. कन्नड, मल्याळम, तेलगू, तमिळ आणि हिंदी भाषेतील चित्रपटगृहांमध्ये (Radhe Shyam release in 5 Languages) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

2021 च्या अखेरीस अचानक कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला, त्यामुळं सिनेमागृहांत शांतता पसरली होती. अशा स्थितीत नियोजित चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखेची चिंता चित्रपट निर्मात्यांना होती. एकीकडं कोरोना आपला वेग वाढवत होता, तर दुसरीकडं चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत होती. त्यामुळं अनेक निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांची तारीख पुढं ढकलली. कोरोना महामारीमुळं मोठ्या बजेटच्या चित्रपटांच्या रिलीज डेटवरही परिणाम झालाय. शाहिद कपूरच्या 'जर्सी' या चित्रपटाची रिलीज डेट बदलली, त्यानंतर एसएस राजामौलीच्या 'आरआरआर' (RRR) चित्रपटाची तारीखही पुढे ढकलण्यात आलीय.

प्रभासचा राधे श्याम हा चित्रपट मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. हा चित्रपट प्रभासच्या सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असल्याचं बोललं जातंय. अशा परिस्थितीत निर्मात्यांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता. प्रभास आणि पूजा हेगडे जोडी व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर (Sachin Khedekar), प्रियदर्शी पुलीकोंडा, भाग्यश्री, कुणाल रॉय कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन के. के. राधाकृष्ण कुमार (K. K. Radhakrishna Kumar) यांनी केलंय. तर याची निर्मिती वामसी कृष्णा रेड्डी, प्रमोद उप्पलापती आणि भूषण कुमार यांनी केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT