Kanguva Movie
Kanguva Movie Esakal
मनोरंजन

Kanguva Movie: टॉलिवूड आणखी एक धमाका करण्यासाठी सज्ज! सुपरस्टार सूर्याच्या 'कांगुवा'चं टिझर रिलिज

Vaishali Patil

सध्या मनोरंजन विश्वात टॉलिवूडच्या चित्रपटांची चलती दिसत आहे. नुकतच दसरा आणि शांकूतलम हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. नुकतच मोस्ट वेडेड चित्रपट केजीएफ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाली.

आता त्यातच आणखी एका बिगबजेट चित्रपटाची घोषणा नुकतिच करण्यात आली आहे. टॉलिवूड आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट देण्यासाठी सज्ज आहे.

तामिळ अभिनेता साउथ स्टार सूर्याच्या ४२व्या चित्रपटाची अखेर निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केली आहे. आतापर्यंत या प्रकल्पाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता निर्मात्यांनी पोस्टर रिलीज करून सुर्याच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवली आहे. सुर्याचा नव्या चित्रपट नाव 'कंगुवा' आहे.

सूर्याने रविवारी 'कांगुवा'ची घोषणा केली आहे. 'कांगुवा' ही एका पराक्रमी शूर वीराची गाथा आहे. महत्वाचं म्हणजे या चित्रपटात बॉलिवूडची अतिशय सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री दिशा पटनीही स्क्रिन शेअर करतांना दिसणार आहे.

'कांगुवा' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शिवाने केले आहे. हा चित्रपट 10 भाषांमध्ये रिलिज होईल जो 3D मध्ये असेल. ग्रीन स्टुडिओच्या के.ई. द्वारे निर्मित 'कंगुवा' मध्ये सुर्या दिसले.

त्याचबरोबर निर्मात्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. सुमारे एक मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये ग्राफिक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. एक माणूस घोड्यावर बसलेला दाखवला आहे आणि त्याचा चेहरा मुखवटाने झाकलेला आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडमध्ये 'कांगुवा'चा साउंड ट्रॅक वाजतोय. व्हिडीओ पाहून असे वाटते की, हा चित्रपट अॅक्शनने भरलेला असेल. शाह आणि मॅटशी संबंधित दृश्य चित्रपटात दाखवले जाणार आहेत.

'कंगुवा' कधी रिलीज होणार याबद्दल मेकर्सने सांगितले की, 'आम्हाला सुर्याच्या 42 व्या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल खूप विचार करावा लागला. यात यावेळी सूर्या पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आम्ही चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होताच रिलीजची तारीख जाहीर करू." 'कांगुवा'चे शूटिंग गोवा, चेन्नई आणि अनेक ठिकाणी होणार आहे. त्याचे ५० टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT