Standup Comedian Kunal Kamra tweet A six word tweet with an hashtag by a Foreign pop artist has shaken the country  
मनोरंजन

विदेशी सेलिब्रेटी बोलले तर देश हलला, लाखो शेतक-यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची धग थेट परदेशात जाऊन पोहचली. मात्र त्याची दखल केंद्र सरकार घेत नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीत सुरु असणारे हे आंदोलन प्रजासत्ताक दिनी चिघळले होते. त्यावेळी उसळलेला जनक्षोभ सगळया देशानं पाहिला. त्यावरुन संपूर्ण देशातून सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली. यात अनेक क्षेत्रातील सेलिब्रेटी सहभागी झाले होते. विशेषत काही परदेशी सेलिब्रेटींनी त्यात घेतलेला सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. त्यामुळे भारतीय कलावंतांना जाग आल्याची टीका आता होऊ लागली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत कॉमेडियन कुणाल कामरानं सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना आता ट्विटरवर दोन गट तयार झाले आहेत. एकीकडे या आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि दुसरीकडे एकी राखा असं भारतीयांना आवाहन करणारे दोन गट ट्विटरवर एकमेकांविरुद्ध उभे राहिले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप सिंग रिहानापाठोपाठ पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस आणि पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी ट्विट केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कंगणानं काल केलेल्या व्टिटमध्ये त्या काही परदेशी सेलिब्रेटींवर टीका करण्यात आली आहे. कंगणानं त्या सगळ्यांना पप्पूची टीम असे म्हटले असून हा सगळा विदूषकांचा बाजार असल्याची टीका केली आहे.

कुणाल कामरानं आपल्या व्टिट मध्ये असे म्हटले आहे की, व्टिटवर सहा अक्षरी एक शब्द टाईप करुन त्यापुढे हॅशटॅग करुन प्रसिध्द केले जाते. एका अमेरिकन पॉप सिंगरनं देशाला जाग आणली. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून लाखभर शेतकरी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत बसले असून त्यांना आपल्या हक्कासाठी आणखी लढावे लागत आहे. आणि काहीजण अद्याप असे म्हणतात की, आमच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा अजिबात प्रभाव नाही. हे सगळे गोंधळात टाकणारे आहे. अशी टिप्पणी कामरानं केली आहे. कामरानं एक तासांपूर्वी केलेल्या व्टिटला सात हजार जणांनी रिव्टिट केले आहे. तर 30 हजार जणांनी लाईक केले आहे. 

यापूर्वी  अभिनेत्री कंगना राणावत, अक्षय कुमार, अजय देवगण, दिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांनी ट्विटच्या माध्यमातून ग्लोबल सेलिब्रिटींना प्रत्युत्तर दिलं होतं. #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या ट्रेंडच्या माध्यमातून ट्विटरवर सेलिब्रिटींच्या ट्विट्सची मालिका सुरू झाली होती. सध्या परदेशी कलावंतांच्या प्रतिक्रियांवरुन भारतीय सेलिब्रेटींना जाग आल्याची टीकाही नेटीझन्सनं केली आहे. इतक्या दिवसांपासून सुरु असणा-या आंदोलानाविषयी कुणीही प्रतिक्रिया दिली नव्हती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT