Aai Kuthe Kay Karte, Aai Kuthe Kay Karte episode update, Aai Kuthe Kay Karte todays episode SAKAL
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धने वीणाच्या कंपनीत घातला मोठा घोळ, नितीन करणार पर्दाफाश

वीणासाठी आशुतोषने तिच्या बिझनेसमध्ये मदत व्हावी म्हणून कॉन्ट्रॅक्ट केलाय.

Devendra Jadhav

Aai Kuthe Kay Karte Episode Update: आई कुठे काय करते मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणार आहे. मालिकेत काही दिवसांपुर्वीची आशुतोषची बहीण वीणाची एंट्री झालीय. वीणा अनिरुद्धची बिझनेस पार्टनर झालीय.

वीणासाठी आशुतोषने तिच्या बिझनेसमध्ये मदत व्हावी म्हणून कॉन्ट्रॅक्ट केलाय. आता याच कॉन्ट्रॅक्टमध्ये अनिरुद्ध मोठा बदल करणार आहे. आणि अनिरुद्धचा खोटेपणा सर्वांसमोर आणणार आहे.

(star pravah aai kuthe kay karte 22 may episode update )

मालिकेच्या आजच्या भागात अरुंधती अमेरिकेला जाणार याची चर्चा देशमुखांच्या घरात सुरु असते. अनिरुद्ध यावर त्याची खोचक मतं मांडत असतो.

संजना मात्र अरुंधतीची बाजू घेऊन कांचन - अप्पांना समजावत असते. अरुंधतीची अमेरिकेला कोणतीही गैरसोय नाही, असं संजना सर्वांना सांगते.

इतक्यात इशा - अनघा अरुंधतीला भेटण्यासाठी केळकरांच्या जायला निघतात. पण अनिरुद्ध त्यांच्यावर चिडतो. इतक्या रात्री जायची काही गरज नाही, असं अन्या त्या दोघींना सांगतो.

अनिरुद्ध बाहेर जायला निघतो. तेव्हा संजना त्याचंच वाक्य त्याला सुनावते. तेव्हा अनिरुद्ध तिच्यावर चिडतो. पुढे केळकरांच्या घरी गप्पांची मैफिल जमली असते.

सगळे दहीवडे खाऊन तृप्त झाले असतात. इतक्यात सुलेखाताई अरुंधतीला अमेरिकेत स्वतःची काळजी घ्यायचा सल्ला देतात. तोच दाराची बेल वाजते.

अनिरुद्ध दाराबाहेर उभा असतो. त्याच्या हातात पुष्पगुच्छ असतो. सर्वांना इतक्या रात्री अनिरुद्धला पाहून आश्चर्य वाटतं.

अनिरुद्ध अरुंधतीला परदेशवारीसाठी शुभेच्छा देतो. इतक्यात तो कॉन्ट्रॅक्ट वीणाला देतो. वीणा त्यावर सही करते. अनिरुद्ध मनातून खुश होतो.

त्याने आशुतोषला पार्टनर म्हणून काढलं असतं. तो नवीन कॉन्ट्रॅक्ट मध्ये स्वतःला वीणाच्या कंपनीचा ५० टक्के भागीदार करतो. वीणा आणि इतर कोणाला याची कल्पना नसते. वीणा कॉन्ट्रॅक्टवर सही करते.

अनिरुद्ध जातो. नितीनला मात्र संशय येतो. तो आशुतोषला सांगतो की, मी उद्या ऑफिसला गेल्यावर कॉन्ट्रॅक्ट पुन्हा वाचणार.

पुढच्या दिवशी सर्वांसमोर अनिरुद्धचा खोटा चेहरा उघड होतो. वीणाला सुद्धा धक्का बसतो. आता याचे अनिरुद्धला काय परिणाम भोगावे लागणार, हे मालिकेच्या पुढच्या भागात कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT