Subodh Bave Post, Marathi Movie Har Har Mahadev, Audience Letter Instagram
मनोरंजन

Subodh Bhave Post: महाराजांना शेवटचं पाहून स्वतः ला संपवणार होता, पण 'हर हर महादेव'मुळे बदलला निर्णय

'हर हर महादेव' पाहून व्यवसायानं इंजिनिअर असणाऱ्या प्रेक्षकानं सुबोध भावेला लिहिलेलं पत्र सध्या भलतंच चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

Har Har Mahadev: अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला आणि सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे यांच्या अभिनयाने सजलेला ‘हर हर महादेव’ दिवाळीत २५ ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून भारतभरात प्रदर्शित झाला. सिनेमातील गाण्यांनी आणि संवादानं रिलीजआधीच सोशल मीडियावर भरपूर प्रसिद्धि मिळवली होती. सिनेमा रिलीज झाल्यानंतर आता सुबोध भावेला 'हर हर महादेव' पाहिलेल्या एका प्रेक्षकाचं एक पत्र आले आहे. जे अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. (Subodh Bave Post, Marathi Movie Har Har Mahadev, Audience Letter)

हर हर महादेव सिनेमाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. थिएटरमध्ये सिनेमा लागलेला असताना दरम्यान आता सुबोध भावेनं सिनेमा संदर्भात केलेली एक पोस्ट चर्चेत आलेली आहे. सुबोधनं हर हर महादेव पाहून आल्यानंतर एका प्रेक्षकानं लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. ज्यात चाहत्यानं आपण काही वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या करणार होतो असं म्हटलं आहे. '' हर हर महादेवचा प्रोमो पाहिला, वाटलं... सिनेमातनं शेवटचं महाराजांना पहावं आणि मग स्वतःला संपवावं. म्हणून सिनेमा पाहिला आणि...'' ,चला सविस्तर जाणून घेऊया त्या इंजिनिअर असलेल्या प्रेक्षकानं पत्रात नेमकं काय लिहिलं आहे.

त्या प्रेक्षकानं पत्रात लिहिलं आहे, ''आज दि. २५-१०-२०२२ हा दिवस माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस आहे. मी एक सिव्हिल इंजिनिअर आहे. परंतू मी माझ्या वैयक्तिक आयु्ष्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा विचार करत होतो. परंतु एका सिनेमाचा ट्रेलर पाहून वाटलं की एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून डोळे मिटावे. परंतु सिनेमा पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पाहिले,कितीही संकटं आली तरी आपलं ध्येय पूर्ण करायचे या जिद्दीवर त्यांनी कसं स्वराज्य निर्माण केलं,हे सारं पाहिलं आणि भारावनू गेलो.

सईबाई आणि महाराजांमधील तो क्षण माझ्या आयुष्यात मला खूप महत्त्वाचा वाटतो. तो पाहिल्यावर मी ठरवलं...मी कधीच आयुष्यात खचून जाणार नाही आणि आत्महत्या तर मुळीच करणार नाही...'' त्या प्रेक्षकानं सुबोध भावे सोबतच सिनेमात भूमिका करणाऱ्या सायली संजीव,शरद केळकर यांचे आणि दिग्दर्शक अभिजित देशपांडेचे देखील आभार मानले आहेत.

सुबोधनं ही पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,''शिवछत्रपती यांचे चरित्र नेहमीच सर्वांच्या जगण्याची प्रेरणा आहे. या पत्रावरून ते पुन्हा एकदा सिद्ध झालं.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुम्हाला उत्तम आयुष्य जगायची ऊर्जा देवो याच सदिच्छा..''

सुबोध भावेच्या या पोस्टवर मराठी कलाकारांसोबतच अनेक चाहत्यांनी देखील भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT