Subodh Bhave Esakal
मनोरंजन

Subodh Bhave: तू तर ऐतिहासिक भूमिका करणार नाही म्हटला, आता....सुबोध भावेनं शब्द मोडला..झाला ट्रोल

सकाळ डिजिटल टीम

मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणजेच सुबोध भावे . त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका नेहमी साकारत असतो. त्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आता सुबोध भावे ‘ताज : डिव्हायडेड बाय ब्लड’ या नव्या वेबसिरीजमुळं चर्चेत आहेत. त्याने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये सुबोध भावेनं लिहिलं की, ''लहापणापासूनच ज्याच्या गोष्टी ऐकल्या,ज्याच्या हुशारी वर प्रेम केलं त्या " बिरबल " ची व्यक्तिरेखा या आगामी वेब मालिके मध्ये साकारताना अत्यंत आनंद होतोय. लवकरच काही दिवसात ही वेब मालिका तुम्हाला Zee 5 वर पाहता येईल''. त्यामुळं तो या वेब सिरिज आता बिरबलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

हे माहित झाल्यानंतर त्याच्यामध्ये उत्सुकता वाढली तर अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं. मात्र काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे. याच कारण आहे त्याची यापुर्वीची घोषणा. सुबोधने या आधी जेव्हा 'हर हर महादेव' या सिनेमावरुन वाद झाला त्या वेळी सुबोध भावेवरही टिका करण्यात आली होती. तेव्हा तो म्हणाला,''बापजन्मात कुठल्या बायोपीकमध्ये काम करणार नाही. आपण यापुढील काळात आपण कोणताही ऐतिहासिक भूमिका करणार नाही. असे म्हटले आहे."

मात्र आता त्याने पुन्हा बिरबलाची भुमिका साकरली आहे. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळं त्याला ट्रोल केलं जातं आहे. त्याच्या पोस्टला कमेंट करत नेटकऱ्यांनी म्हटलंय, 'ह्यापूढे कोणतेच ऐतहासीक व्यक्तिरेखा साकारणार नाही" अशी घोषणा केली होती आपण. त्याचे काय' , 'सर मला वाटलं तुम्ही हिंदीमध्ये काम करणार नाहीत.', 'आता काय बीरबल भावे म्हणायचं का..?', अशा प्रतिक्रियेबरोबरच त्याच्यावर काहींनी अभिनंदनाचाही वर्षाव केला आहे. त्यांना हिदिं मनोरंजन विश्वात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बहिणीचा पुरलेला मृतदेह उकरुन बँकेत आणला; वीस हजारांसाठी गरीब भावाचा संताप, व्हिडीओ व्हायरल

Virat Kohli: किंग कोहलीनं ऑटोगाफच दिला नाही... चिमुकला बॅट आपटत ढसाढसा रडला; Video तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update: बुलढाण्यातील खामगाव चौकात प्रशांत आंबी यांचं आंदोलन सुरु

'स्मिता पाटील यांच्या बर्फावरील पार्थिवाचा मी मेकअर करत होतो' आर्टिस्ट म्हणाले, 'तिची शेवटची इच्छा...'

Shivaji Kon Hota : प्रकाशक प्रशांत आंबी बुलढाण्यात स्थानबद्ध, डाव्या चळवळीतील कार्यकर्ते संजय गायकवाड यांच्याविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT