Mother's Day 2023- Subodh Bhave Post Instagram
मनोरंजन

Mother's Day 2023: 'मदर्स डे' ला सुबोध भावेनं पोस्ट केलेलं बोधचित्र चर्चेत..अभिनेत्यानं आई म्हणून साद घातलीय ती चक्क..

'मदर्स डे' निमित्तानं आज सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी आपल्या आईचा फोटो शेअर करत खास पोस्ट केल्या आहेत पण सुबोध मात्र याला अपवाद ठरलाय.

प्रणाली मोरे

Mother's Day 2023: आज सर्वत्र 'मदर्स डे' साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच या मदर्स डे सेलिब्रेशनमध्ये व्यस्त दिसत आहेत. अनेकांनी आपल्या आईसोबतचा फोटो पोस्ट करत तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सुबोध भावेनं देखील मदर्स डे निमित्तानं एक पोस्ट शेअर केली आहे,जी सध्या चर्चेत आहे. सुबोधनं आपल्या मदर्ड डे पोस्टमध्ये आईचा फोटो नाही तर एक बोधचित्र शेअर केलं आहे आणि त्याला आई म्हणून साद घातली आहे. चला जाणून घेऊया नेमकी काय आहे सुबोधची पोस्ट?(Mother's Day 2023- Subodh Bhave Post)

सुबोध भावेनं मदर्स डे निमित्तानं शेअर केलेल्या पोस्ट मध्ये एक बोधचित्र शेअर केलं आहे जे निसर्गाचं सुंदर दर्शन घडवत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुबोध त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कधी निसर्गाचे तर कधी निसर्गाच्या सान्निध्यातील त्याचे फोटो पोस्ट करताना दिसत होता. त्यामुळे मदर्स डे निमित्तानं निसर्गाला..धरणीला..पृथ्वी मातेला आई म्हणून साद घालत त्यानं या दिवसाचं महत्त्व थोडं अधिक वाढवलं आहे.

सुबोध भावेची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांना भलतीच आवडली आहे. अनेकांनी त्याचं यामुळे कौतूकच केलं आहे. सुबोध भावे अनेकदा अशा वेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसतो. त्याच्या पोस्ट या अनेकदा चांगला विचारही देऊन जातात.

नुकताच सुबोध भावे आपल्याला 'फुलराणी' या सिनेमाच्या निमित्तानं भेटीस आला होता. त्याचा हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फारसा चालला नसला तरी प्रेक्षकांच्या कौतूकास मात्र पात्र ठरला एवढं नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT