subodh bhave, priyadarshini indalkar, phulrani, phulrani movie showtimings, phulrani movie SAKAL
मनोरंजन

Phulrani: सलमानचा जयजयकार, पण मराठी कलाकाराने केलं तर तुमच्या पोटात दुखतं, सुबोध भावेचा तिखट सवाल

सुबोध भावे आणि प्रियदर्शनी इंदलकर यांचा फुलराणी सिनेमा नुकताच रिलीज झालाय

Devendra Jadhav

Subosh Bhave News: सुबोध भावे आणि प्रियदर्शनी इंदलकर यांचा फुलराणी सिनेमा नुकताच रिलीज झालाय. या सिनेमात सुबोध भावे अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सोबत अभिनय करतोय. या सिनेमात सुबोध भावे प्रियदर्शनी सोबत रोमान्स करताना दिसतोय.

यामुळे प्रेक्षकांनी सुबोधला ट्रोल केलं गेलंय. फुलराणीच्या प्रीमियरच्या वेळी एका मुलाखतीत सुबोधने स्वतःचं परखड मत व्यक्त केलंय.

(subodh bhave reply to tollers who troll him after he romanced with priyadarshini indalkar in phulrani movie)

सुबोध म्हणाला, 'माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर काम करण्यावरुन अनेकदा मला ट्रोल केलं जातं. चित्रपटासाठी कास्टिंगही मी करतो, माझ्याबरोबर काम कोणी करायचं हे देखील मी ठरवतो, पात्रही मीच लिहितो, असे त्यांना वाटते.

त्यामुळे मला त्यांना सांगायचं की बाळांनो सिनेमात भूमिका आहे आहे, यावरुन हे सर्व ठरत असतं.'

सुबोध पुढे म्हणाला.. 'मला वयाने लहान असलेल्या मुलींबरोबर काम करायला काहीही अडचण नाही. दिग्दर्शकांनाही काही अडचण नाही. ‘तुला पाहते रे’ मालिकेमुळे मला याची सवय लागली. पण अडचण प्रेक्षकांना आहे. ही त्या गोष्टीची गरज आहे.

पण मीही या सर्व झोनमधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. काही वेगळे पात्र मिळतात का, याचाही मी शोध घेत आहे,' असेही त्याने सांगितले.

पुढे सुबोधने बॉलिवूडची तुलना करून मराठी प्रेक्षकांच्या उदासीनतेवर बोट ठेवलं. सुबोध म्हणतो, 'फुलराणी हा चित्रपट माझ्याकडे फार आधी आला होता.

सलमान खान, आमिर खान या सर्व कलाकारांनी काहीही केलं तुम्हाला चालतं, पण मराठी कलाकारांनी काही करायचं म्हटलं तर तुमच्या पोटात दुखायला सुरुवात होते.

ही समस्या आपल्याकडच्या बऱ्याचशा लोकांमध्ये आहे,' असे परखड भाष्य त्याने केले.

विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी...अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.

सिनेमात सुबोध भावे, प्रियदर्शनी इंदलकर, सुशांत शेलार अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

Pregnancy Job Scam : महिलांना गरोदर करा आणि कमवा 10 लाख! 'प्रेग्नंट जॉब सर्विस'च्या नावाखाली मोठा घोटाळा उघड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT