subodh bhave shared post about first theatre museum in mumbai marathi natya vishwa sakal
मनोरंजन

जगातील पहिलं नाट्य संग्रहालय मुंबईत.. सुबोध भावेची खास पोस्ट

मराठी नाटकांचा समृद्ध इतिहास मांडणारे 'मराठी नाट्य विश्व' हे दालन मुंबईत उभारणार असून त्याच्या बोधचिन्हाचे नुकतेच अनावरण करण्यात आले.

नीलेश अडसूळ

marathi natya vishwa : मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणजेच सुबोध भावे (subodh bhave). सुबोध वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका नेहमी साकारत असतो आणि त्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक चरित्र भूमिका साकारणारा एकमेव अभिनेता सुबोध याचे चरित्र अभिनेता असं समीकरण झालं आहे. सुबोधनं यापूर्वी बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या चरित्र भूमिका साकारल्या आहेत. नुकतच त्याच्या 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाची परदेश वारी झाली. या नाटकाच्या निमित्ताने सुबोधने बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. सुबोध अनेक समस्या आणि सामाजिक गोष्टींवरही भाष्य करत असतो. यंदा त्याने नाट्य क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण असल्याचे म्हंटले आहे.

मराठी नाटकाचा समृद्ध इतिहास सांगणाऱ्या 'मराठी नाट्य विश्व' या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. याच पार्श्वभूमीवर सुबोध भावेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचे आभार व्यक्त केले आहेत. सुबोध म्हणतो, “तुम्हा सगळ्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर करताना अतिशय अभिमान वाटतोय. जगभरात कुठेही नाटकाचं संग्रहालय नाही. जगातील पहिलं नाटकाचं संग्रहालय उभारण्याचा मान आपल्या महाराष्ट्राला मिळतोय. आणि हे संग्रहालय असणार आहे मराठी नाटकाचं “मराठी नाट्य विश्व”. (subodh bhave shared post about first theatre museum in mumbai marathi natya vishwa)

'मुंबई येथे गिरगाव चौपाटी वर सद्य स्थितीत असलेल्या बिर्ला क्रीडा केंद्र च्या जागी हे भव्य दिव्य आणि मराठी नाटकाचा इतिहास सांगणार “मराठी नाट्य विश्व” उभं राहतय. मराठी नाटकाच्या सर्व शाखा आणि सर्वांना सामावून घेणारं हे संग्रहालय असेल. जगभरातील नाटकाच्या अभ्यासक आणि रसिक प्रेक्षकांसाठी हे एक आनंदाचं दालन असेल. ही कल्पना आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांची. त्यांच्या कल्पनेतून हे मराठी नाटकाचं संग्रहालय उभे रहात आहे.'

'महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होतंय. आणि आज मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते “मराठी नाट्य विश्व” चं बोधचिन्ह आणि वास्तूचं स्वरूप लोकार्पण करण्यात आलं. आम्हा सर्व रंगकर्मी आणि नाटकावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने मी मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे मनापासून आभार व्यक्त करतो”, असे सुबोध भावे म्हणाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT