Suchitra Krishnamoorthi says daughter Kaveri made her join dating site Google
मनोरंजन

अभिनेत्रीच्या मुलीनं डेटिंग App वर बनवलं आईचं प्रोफाईल; नंतर जे घडलं ते...

अभिनेत्री सुचित्रा कृष्णमुर्तीनं एका मुलाखतीत या डेटिंग App च्या अनुभवाचा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

सुचित्रा कृष्णमुर्ती(Suchitra Krishnamoorthi) आणि शेखर कपूर(Shekhar Kapoor) यांनी १९९७ साली लग्न केलं आणि ते २००६ साली विभक्त झाले. त्या दोघांना एक मुलगी आहे जिचं नाव कावेरी कपूर(Kaveri Kapoor)आहे. ती गायक आहे आणि लवकरच अभिनय क्षेत्रातही ती पदार्पण करणार आहे. कावेरी सध्या आपली आई सूचित्रा कृष्ममुर्ती सोबत राहते. सुचित्रानं मागे एका मुलाखतीत आपण मुलीला एकटं वाढवतोय, पण असं असलं तरी मी जरा देखील मुलीच्या बाबतीत कडक नाही असं म्हटलं होतं. माझे आई वडील जसे माझ्याबाबतीत कडक होते तशी मी मुळीच नाही अंस सूचित्रा म्हणाली होती. आपल्या मुलीनं आपल्याला जबरदस्ती डेटिंग App वर प्रोफाईल बनवायला लावलं आहे असा खुलासा देखील तिनं केला होता.(Suchitra Krishnamoorthi says daughter Kaveri made her join dating site)

सुचित्रा पुढे म्हणाली, ''ती एक पालक म्हणून खूप सजग आहे की जेणेकरून तिच्या मुलीकडून कोणतंही चुकीची गोष्ट घडणार नाही याकडे ती कटाक्षानं लक्ष ठेवते. तिनं सांगितलं की, काही बाबतीत माझे विचार खूप जुने आहेत. पण मुलीला वचन दिल्या कारणानं मी माझ्यावर जी काही बंधन घालून घेतली होती त्यांच्यातून मला बाहेर पडावं लागलं''. सुचित्रा कृष्णमुर्तीची मुलगी लवकरच अमरिश पुरी यांचा नातू वरधान पुरीसोबत सिनेमात काम करताना दिसणार आहे.

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा म्हणाली आहे की,''माझी मुलगी कावेरीनं मला पहिल्यांदा डेटिंग App ची ओळख करुन दिली. मी तिला वचन दिलं होतं म्हणून मला होकार द्यावा लागला. पण त्यानंतर मात्र माझं मन तयार होईना. शेवटी मुलीला म्हटलं,'बच्चा,हे माझं काम नाही'. तिनं माझं प्रोफाईल माझं न ऐकता डेटिंग App वर बनवून टाकलं. आणि डेटवर जाण्याची जबरदस्ती करायला लागली. तिनं माझे फोटो देखील तिथं अपलोड केले होते. पण त्यानंतर खूप विचित्र मेसेज यायला लागले''. सुचित्रानं हे देखील सांगितलं की,शेखर कपूर पासून वेगळं झाल्यावर ती एका रिलेशनशीपमध्ये होती,जे एक वर्ष चाललं. पण याबाबतीत कोणाला काहीच माहिती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT