Money Laundering Case Esakal
मनोरंजन

Money Laundering Case: अभिनेत्रींनंतर बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्यावर ईडीची कारवाई! तर सुकेशचा कोठडीतील मुक्काम वाढला

सकाळ डिजिटल टीम

Money Laundering Case: 200 कोटींच्या मनी लाँडरिग प्रकरणात अनेक नवनविन खुलासे झाले आहेत आणि अजुनही ते सुरुचं आहे. या प्रकरणासदर्भातच अजून एक बातमी समोर आली आहे. या प्रकरणात सुकेश चंद्रशेखरच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचे म्हणणे आहे की त्यांना दीपक रमदानीची चौकशी करायची आहे. 

सुकेशने तुरुंग अधिकाऱ्यांना केलेल्या पेमेंटची माहिती ईडीला हवी आहे. सुकेशशिवाय त्याचा साथीदार दीपक रामदानी यालाही ईडीने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

आता ED ने चित्रपट निर्माता करीम मोरानी यांला 200 कोटींच्या सुकेश चंदशेखर मनी लाँडरिंग प्रकरणात समन्स पाठवले आहे.

सुकेशच्या माध्यमातून चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला घर भेटवस्तू देण्याच्या प्रकरणातही करीम मोरानीचे नाव समोर आले होते. याच अनुषंगाने करीम मोरानी यांना येत्या एक ते दोन दिवसांत ईडीसमोर हजर व्हायचे आहे.

करीम मोरानी हा एक भारतीय चित्रपट निर्माता आहे ज्याने चेन्नई एक्सप्रेस आणि शाहरुख खान स्टारर 'रा वन' सारखे चित्रपट बनवले आहेत. मोरानी आणि त्यांचा भाऊ एली मोरानी हे देखील एका चित्रपट निर्मिती आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सह-मालक आहेत.

ही काही पहिलिच वेळ नाही की मोरानी वादात सापडले आहेत. यापुर्वीही 2G स्पेक्ट्रम प्रकरणात त्याचं नाव पुढे आलं होतं. 2017 मध्ये दिल्ली पोलिसांनी 25 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी मोरानीवर हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

23 सप्टेंबर 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने मोरानीला त्याच्याविरुद्धच्या कथित बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर मोरानीला हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे लागले. सध्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चित्रपट निर्माता पुन्हा ईडीच्या रडावर आला आहे

महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आजवर अनेक खुलासे झाले. यात जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही एवढेच नाही तर टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना निक्की तांबोळी, सोफिया सिंग आणि आरुषा पाटील यांच्या नावाचाही यात समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

ZIM vs SL 2nd T20I: झिम्बाब्वेने माजी Asia Cup विजेत्या श्रीलंकेचा कचरा केला; ८० धावांवर संपूर्ण संघ गुंडाळला

Ganpati Visarjan 2025 Live Updates : 1935 पासून हरिनामाच्या गजरात निघते सार्वजनिक गणपतीची बैलगाडीतून मिरवणूक

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

SCROLL FOR NEXT