Sukesh Chandrashekhar And Jacqueline Fernandez  Esakal
मनोरंजन

'तुझं हदय दिल्याबद्दल, वाढदिवसाच्या दिवशी सुकेशला सतावतेय जॅकलिनची आठवण; पाठवलं प्रेमपत्र Jacqueline-Sukesh

सकाळ डिजिटल टीम

महाठग सुकेश चंद्रशेखर जरी सध्या तुरुंगात असला तरी तो नेहमीच चर्चेत असतो. 200 कोटी रुपये आणि खंडणीच्या आरोपाखाली सध्या तो कारागृहात शिक्षा भोगत आहे. तुरुगांत असुनही तो जॅकलिनला सोडयला तयार नसल्याचं दिसतयं.

नुकतच होळीच्या निमित्ताने त्याने जॅकलिनला प्रेमपत्र लिहिलं होतं. या पत्राची चांगलीच चर्चा रंगली होती. आता त्यातच सुकेशने पुन्हा त्याच्या वाढदिवसानिमित्त जॅकलिनला पत्र लिहल आहे.

सुकेश चंद्रशेखर यांनी 25 मार्च रोजी वाढदिवसाच्या दिवशी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने जॅकलीन फर्नांडिसला बेबी म्हटलं आणि तो तिला मिस करत असल्याचंही लिहिलं.

'माझ्या बोम्मा, माझ्या वाढदिवशी मला तुझी खूप आठवण येते, मला तुझी एनर्जी माझ्या सभोवताली जाणवते. माझ्याकडे शब्द नाहीत, पण मला माहित आहे की तुझं माझ्यावरचं प्रेम कधीच संपणार नाही. तुझ्या हृदयात काय आहे हे मला माहीत आहे. मला पुराव्याची गरज नाही आणि माझ्यासाठी फक्त तुझं प्रेमच पुरेस आहे. बेबी.'

पुढे पत्रात तो लिहितो की, तुला माहिती आहे, काहीही झालं तरी मी नेहमीच तुझ्यासाठी उभा आहे. मी तुझ्यावर खुप प्रेम करतो बेबी. मला तुझे हृदय दिल्याबद्दल धन्यवाद.

त्याचबरोबर सुकेशने केवळ जॅकलिनसाठीच नाही तर त्याच्या मित्रांसाठी यापत्रात लिहिलं आहे. तो लिहितो की, माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मी माझ्या सर्व समर्थकांचे आणि मित्रांचे आभार मानतो. मला शेकडो पत्रे आली आहेत, अभिनंदन. मला धन्य वाटते, धन्यवाद.

जॅकलिन आणि सुकेश यांच्या नात्याची बरिच चर्चा गाजली. दोघांचे बरेच फोटोही व्हायरल झाले होते. याप्रकरणी जॅकलिनची चौकशी सुरु आहे. तिच्यावर आरोप आहे की तिला सर्व सत्य माहिती असूनही ती सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात होती. तिने त्याच्याकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्या आहेत.

दोघांचे अफेअर असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. याप्रकरणी नोरा फतेहीचीही चौकशी करण्यात आली होती. मात्र सुकेशने याप्रकरणात जॅकलिनची काहीच चुक नसल्याचं सांगितलं आणि वेळोवेळी तो जॅकलिनची पाठराखण करत असतो. त्यातच आता त्याचं तिच्यासाठी पुन्हा लव्ह लेटर आल्याने अनेक नवीन चर्चा सुरु झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : महाडिक, मुश्रीफ, कोरे, आबिटकर विरूद्ध सतेज पाटील लढणार गोकुळ निवडणूक?; सात संचालकांचा पाठिंबा, नव्या आघाडीची घोषणा

'मी मुख्यमंत्री साहेबांना फोन केला होता. कारण...' रितेश देशमुख म्हणाला, 'सेट उभा करण्यासाठी जागा नव्हती तेव्हा त्यांनी...'

Latest Marathi News Live Update : अमरावतीत स्कूलबसच्या भाड्यात २५ टक्के वाढ

बेटा तुला डॉक्टर व्हायचं बेटा... RCC च्या शिवराज मोटेगावकर प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलासाठी कसा मिळवला NEET पेपर? मोठं नाव समोर

Hasan Mushrif : साखर कारखानदारांवर सामूहिक आत्महत्येची वेळ, मुश्रीफ असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT