Suman Kalyanpur achieve padma shri award in padma awards 2023 her voice music journey and career films  sakal
मनोरंजन

Suman Kalyanpur: नुकत्याच 'पद्मभूषण' ठरलेल्या सुमन कल्याणपूर कोण होत्या? त्यांच्याविषयी थोडक्यात..

लता दिदींच्या आवाजाशी ज्यांची तुलना झाली अशा आहेत सुमन कल्याणपूर..

नीलेश अडसूळ

Suman Kalyanpur : मराठीसह बॉलीवुडमध्ये ज्यांच्या आवाजाने प्रेक्षकांना भारावून सोडलं अशा सुमन कल्याणपुर या ज्येष्ठ गायिकेला काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मराठी सह हिन्दी चित्रपटात अनेक गीते गाणाऱ्या सुमन ताईंच्या आवाजाची थेट लता दिदींच्या म्हणजेच लता मंगेशकर यांच्या अवजाशी तुलना केली जायची.. म्हणून जाणून घेऊया या अद्वितीय व्यक्तिमत्वाचा प्रवास..

(Suman Kalyanpur achieve padma shri award in padma awards 2023 her voice music journey and career films )

काल 25 जानेवारी रोजी, प्राजसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारच्या 'पद्म' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यमध्ये अनेक दिग्गजांसह गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांनाही 'पद्मभूषण' पुरस्कार जाहीर झाला.

हेही वाचा : ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

सुमन कल्याणपूर यांचा जन्म बांगलादेशातील भावनिपूर येथे 28 जानेवारी 1937 रोजी झाला. सुमन यांच्या मराठी भावगीत गायनाची सुरुवात ग. दि. माडगुळकरांच्या गीतापासून झाली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ हिन्दी आणि मराठीच नाही तर गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांमध्येही गाणी गायली आहेत.

अत्यंत सुमधुर आवाज आणि शब्दातील भावार्थ अचूकपणे समजून गाणाऱ्या या गायिकेची तुलना लता मंगेशकर यांच्या आवजाशी झाली. पण परंतु सुमन ताईंनी कायमच आपल्या वेगळ्या धाटणीने प्रेक्षकांना आणि संगीत कलेला समृद्ध केले.

सुमन कल्याणपूर यांची अनेक गाणी लोकप्रिय ठरली अगदी आपल्या ओठांवर तरळणारी कित्येक गाणी ही त्यांच्याच आवाजाने सजली आहेट. पण त्या कायमच प्रसिद्धीपासून दूर . राहील्या.  

सुमन कल्याणपूर यांचे सिनेसृष्टीतले आगमन गझलसम्राट तलत मेहमूद यांच्यामुळे झाले. एका कार्यक्रमात गाणं गात असताना तलत मेहमुद यांनी सुमनताईंचा आवाज ऐकला. त्यांनंतर त्यांच्या एका सिनेमासाठी त्यांनी सुमनताईंना विचारणा केली. सुमन कल्याणपूर यांनीदेखील होकार दिला, आणि पुढे त्यांनी अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले.

'जिथे सागरा धरणी मिळते', 'घाल घाल पिंगा वाऱ्या', 'माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर परसात..', 'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, 'कशी गवळण राधा बावरली..', 'नाविका रे वारा वाहे रे', ''केतकीच्या बनी तेथे नाजला ग मोर..'', ''उठा उठा चिऊताई'' अशी कित्येक मराठी गाणी त्यांनी अजरामर केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT