Sumbul Touqeer khan shares pictures of her father Touqeer Khan’s second marriage SAKAL
मनोरंजन

Sumbul Touqeer Khan Father: कबुल है, कबुल है.. बिग बॉस फेम सुम्बुलच्या बाबांनी केलं दुसरं लग्न, फोटो पहाच

वडिलांच्या दुसऱ्या लग्नात सुंबूल अत्यंत आनंदी दिसतेय. सुंबूलच्या वडिलांनी घरच्या घरीच दुसरं लग्न केलंय.

Devendra Jadhav

Sumbul Touqeer Khan Father 2nd Mariage News: 'बिग बॉस 16' आणि 'इमली' फेम सुंबूल तौकीर खानच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. अभिनेत्रीचे वडील तौकीर खान यांनी दुसरं लग्न केलं आहे.

सुंबूलने स्वतः वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एकूणच वडिलांच्या दुसऱ्या लग्नात सुंबूल अत्यंत आनंदी दिसतेय. सुंबूलच्या वडिलांनी घरच्या घरीच दुसरं लग्न केलंय.

(Sumbul Touqeer khan shares pictures of her father Touqeer Khan’s second marriage)

वडिलांच्या लग्नानिमित्त सुंबुलने घर खूप छान सजवले होते. घरात फुलांपासून दिव्यांपर्यंत सर्वत्र लखलखाट होता.

'इमली' अभिनेत्रीने वडील आणि बहीण सानियासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर काही छायाचित्रांमध्ये कुटुंब मिळून प्रार्थना करताना दिसत आहेत.

सुंबुलच्या वडिलांनी निलोफरसोबत लग्न केलंय. निलोफर या घटस्फोटित असून त्यांना एक मुलगी आहे.

तौकीर खानच्या दुसऱ्या लग्न घरगुती पद्धतीने कोणताही गाजावाजा न करता पार पडले. फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते.

हा कार्यक्रम अतिशय खाजगी ठेवण्यात आला होता. काही फोटोंमध्ये सुंबुल मेहंदी लावताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर तिच्या सर्व चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला. चाहत्यांनीही सुंबूल आणि त्याच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या.

काही दिवसांपूर्वी सुंबुल तौकीर खानने त्याचे वडील पुन्हा लग्न करणार असल्याची पुष्टी केली होती. अनेक अडचणींनंतर त्यांनी वडिलांना या लग्नासाठी राजी केले होते.

सुंबूलनं बिग बॉसमध्ये इंट्री घेतल्यानंतर तिचे वडील तौकीर खान हे देखील फेमस झाले होते. सुंबूल आणि तौकिर खान यांची बाँडिंग दर्शवणारे फोटो आणि व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सुंबूल आणि तिच्या लहान बहिणीचे पालनपोषण त्यांच्या वडिलांनी केले आहे. सुंबूलच्या लहान बहिणीचे नाव सानिया असे असून तौकीर हे जेव्हा बिग बॉसमध्ये आले होते तेव्हा

त्यांनी आपल्या दोन्ही मुली आणि त्यांच्याविषयीच्या हळव्या बंधाविषयी सांगितले होते. मुलींनीच वडिलांना दुसऱ्या लग्नसाठी तयार केले असून त्यांची काही अडचण नाही असं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फायद्याची बातमी! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा...

Panchang 18 December 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्राचे पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

ढिंग टांग - सं. मनोमीलन : अंक दुसरा..!

मोठी बातमी! हातभट्टी ज्यांच्या जमिनीवर त्या मालकावरच आता दाखल होणार गुन्हे; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचा इशारा; तलाठी, ग्रामसेवकांना पत्र

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! बस वाटेत बंद पडल्यास ‘शिवाई’तूनही करता येणार त्याच तिकीटावर प्रवास; प्रवाशाने मागितले तर तिकीटाचे पैसेही मिळतात परत

SCROLL FOR NEXT