Sumbul Touqueer Khan esakal
मनोरंजन

Sumbul Touqueer Khan : घरात दोन मुली लग्नाच्या पण, अब्बूजान दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत!

बिग बॉसच्या सोळाव्या सीझनमध्ये सहभागी झालगेल्या सुंबूल तौकीर विषयी अनेकांना माहिती आहे. त्या सीझनमध्ये तिच्या नावाचा बोलबाला होता.

युगंधर ताजणे

Sumbul Touqueer Khan father will be marry again :टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये बिग बॉसची क्रेझ ही काही वेगळीच आहे. आतापर्यत या रियॅलिटी शो चे सोळा सीझन पार पडले आहे. या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळे स्पर्धक, त्यांचे वाद, एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप हे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय राहिला आहे.

बिग बॉसच्या सोळाव्या सीझनमध्ये सहभागी झालगेल्या सुंबूल तौकीर विषयी अनेकांना माहिती आहे. त्या सीझनमध्ये तिच्या नावाचा बोलबाला होता. तिची क्रेझही मोठी होती. सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग असलेल्या सुंबूलच्या बिग बॉसमधील परफॉ़र्मन्सनं चाहत्यांना वेड लावलं होतं. आता सुंबूलविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. तिचे अब्बूजान हे दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सुंबूलनं बिग बॉसमध्ये इंट्री घेतल्यानंतर तिचे वडील तौकीर खान हे देखील फेमस झाले होते. सुंबूल आणि तौकिर खान यांची बाँडिंग दर्शवणारे फोटो आणि व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुंबूल आणि तिच्या लहान बहिणीचे पालनपोषण त्यांच्या वडिलांनी केले आहे. सुंबूलच्या लहान बहिणीचे नाव सानिया असे असून तौकीर हे जेव्हा बिग बॉसमध्ये आले होते तेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही मुली आणि त्यांच्याविषयीच्या हळव्या बंधाविषयी सांगितले होते.

माझ्या वडिलांनी एकट्यांनी आमचे पालनपोषण केले. आम्हाला मोठे केले. मी जेव्हा टीव्ही मनोरंजन क्षेत्रात आले तेव्हा ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभेही राहिले. यासगळ्यात आता सुंबूलच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाची बातमी समोर आली असून त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तौकीर खान यांनी दुसऱ्या लग्नाचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी त्या निर्णय़ाचे स्वागत केले आहे. त्यावर सुंबूलची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुंबूल म्हणाली की, मी खूप आनंदात आहे. त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करते. तौकीर हे पुढच्या आठवड्यामध्ये निलोफरशी लग्न करणार आहे. निलोफर या घटस्फोटीत असून त्यांना एक मुलगी आहे. इ टाईम्सशी बोलताना सुंबूलनं सांगितलं की, आम्ही सर्वजण खूप आनंदात आहोत. आमच्या परिवारात त्यांचे मनपूर्वक स्वागत. आमचे वडील हे आमच्यासाठी मोठी प्रेरणा राहिले आहेत. आम्ही त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो.

माझ्या वडिलांची दुसऱ्या लग्नाला काही हरकत नाही तर मी काय म्हणते याला फारसं महत्व नाही. त्यांनी तो निर्णय घेतला आहे. त्यात ते आनंदी आहेत तर आम्ही सगळ्यांनी त्याचे स्वागत करायला हवे. आम्हाला त्यांच्या दुसऱ्या लग्नासंबंधी कोणतीही अडचण नाही. असेही सुंबूलनं त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT