sundara manamadhe bharli marathi serial latest update latika propose deva sakal
मनोरंजन

Sundara Manamadhe Bharli: माझ्या लेकीसाठी बाप हवा.. म्हणत लतिका दुसऱ्या लग्नाला तयार; देवाला केलं प्रपोज..

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका रंजक वळणावर..

नीलेश अडसूळ

Sundara Manamadhe Bharli Marathi Serial Latest Update : कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhe Bharli) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. गेली काही दिवस ही मालिका बरीच चर्चेत आहे.

शरीराने जाड असणाऱ्या मुलीच्या प्रेमाची ही गोष्ट आता रंजक वळणावर आली आहे. या मालिकेतून अभी आणि लतिका ही जोडी आपल्या भेटीला आली. नंतर मालिकेत अभीचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले.

त्यांनंतर मालिकेत अभ्याच्या नावाने अकादमी उभारण्यासाठी देवा नावाचा इंजिनियर आला आणि देवा आणि लतिकाची केमिस्ट्री सुरू झाली. वाद, भांडण इथून हा सुरू झालेला प्रवास आता प्रेमा पर्यन्त आला.

आजवर देवाने लतिकाविषयीचे प्रेम अनेकदा व्यक्त केले. नपण लतिकाने मात्र घराचा, गावातील लोकांचा विचार करून देवाला कायमच दूर ठेवले. पण अखेर लतिकालाही प्रेमाची जाणीव झाली आहे. हा महत्वाचा आणि रंजक भाग आज प्रदर्शित होणार आहे.

(sundara manamadhe bharli marathi serial latest update latika propose deva )

लतिकाला आणि अभ्याला अदिरा ही मुलगी आहे. अभ्याच्या निधनानंतर लतिकानेच अदिराचा सांभाळ केला आहे. दरम्यान देवा ची एंट्री झाली आणि अदिरा आणि देवा चांगले मित्र झाले. लतिकाच्या आधीही तो अदिराचा मित्र झाला.

मग तो लतिकाच्या आयुष्यात आला आणि त्यांचे नाते सुरू झाले. पण लतिका काही अभ्याचा विचार सोडून देवाचा स्वीकार करायला तयार नव्हती, अनेकांनी त्यांचे सूत जुळवण्याचा प्रयत्न केला पण लतिका तिच्या निर्णयावर ठाम होती.

अखेर मालिकेत तो प्रसंग आला आहे,जेव्हा लतिकाला प्रेमाची जाणीव झाली आज हा महाएपिसोड प्रक्षेपित होणार आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या (marathi serial) आजच्या विशेष भागात लतिका देवाला प्रपोज करताना दिसणार आहे. या विशेष भागाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये लतिका देवाला म्हणत आहे की,"कारखानीस मला माझ्या लेकीसाठी बाप पाहिजे. माझी सुख:दु:ख शेअर करण्यासाठी एक सखा आणि आयुष्यभर झाडे लावण्यासाठी एक जोडीदार पाहिजे". 

आजच्या भागात प्रेक्षकांना लतिका आणि देवाचा भावनिक आणि प्रेमळ अंदाज पाहायला मिळणार आहे. दोघेही एकेमएकांना प्रेमाची कबुली देण्याचा क्षण आजच्या भागात दिसणार आहे. यावेळी देवा लतिकाला अंगठी आणि गुलाबाचं फूल देऊन सर्वांसमोर आपलं प्रेम व्यक्त करताना दिसेल. प्रेक्षकांना या भागाची प्रचंड उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: इशान किशनची बॅट तळपली, ठोकलं पहिलं शतक; कर्णधार सूर्याचीही फिफ्टी; भारताच्या २७० धावा पार...

Pune Traffic: पुण्यातील ७५ किलोमीटरच्या रस्त्यांवर गतिरोधक बसवणार; वाहतुकीच्या दृष्टीने मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update: सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..! - रोहित पवार

Crime: धक्कादायक! आठवीतील मुलगी गर्भवती राहिली; वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना माहितीच नाही, नंतर... जे घडलं त्यानं सगळेच हादरले

IND vs NZ, 5th T20I: संजू सॅमसनने शेवटची संधीही गमावली, घरच्या मैदानातही स्वस्तात आऊट

SCROLL FOR NEXT