Marathi Serials File
मनोरंजन

मालिकांप्रेमींसाठी रविवार असेल खास; जाणून घ्या महाएपिसोड्सचे अपडेट्स

मन झालं बाजिंद, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकांचा एक तासाचा विशेष भाग, तर 'देवमाणूस २'चा महाआरंभ

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीववर येत्या १९ डिसेंबरला ‘मन झालं बाजिंद’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकांचे १ तासाचे विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत आणि याच महाएपिसोडच्या साक्षीने ‘देवमाणूस २’चा (Devmanus 2) महाआरंभ होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात हळदीच्या पिकाची पूजा केली जाते, या पार्श्वभूमीवर हा महाएपिसोड रंगणार आहे. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अशा पद्धतीने हळदीची पूजा दाखवली जाणार आहे, जी प्रेक्षक 'मन झालं बाजिंद' (Man Zal Bajind) मालिकेच्या निमित्ताने पाहू शकणार आहेत. या महाएपिसोडमध्ये विधाते कुटुंबातील सर्वजण हळदीच्या पूजेची तयारी करून शेतात जातात. दुसरीकडे राया कारखान्यातील भेसळ प्रकरणात गुन्हेगार असलेल्या ह्रतिक आणि पप्याला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देणार सोबतच राया कृष्णाला मानानं तिचं कारखान्यातील पद परत करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Marathi Serial Updates)

'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण स्वीटू आणि ओमच लग्न पार पडणार आहे. मालिकेत सध्या आनंदी आनंद दिसतोय आणि त्याचसोबत ओम व स्वीटूच्या लग्नाची लगबग देखील चालू आहे. ओम आणि स्वीटू खूप खुश आहेत, कारण इतक्या कठीण प्रसंगांना तोंड देऊन शेवटी ते दोघे एकत्र येणार आहेत. कोकणच्या मातीत रंगलेला हा ओम आणि स्वीटूचा लग्नासोहोळा हे या १ तासाच्या विशेष भागाचं खास आकर्षण असणार आहे.

या दोन मालिकांसोबतच प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते आणि ज्या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं असा 'देवमाणूस २'चा महाआरंभ होणार आहे. १९ डिसेंबर रोजी 'मन झालं बाजिंद' संध्याकाळी ७ वाजता, येऊ कशी तशी मी नांदायला रात्री ८ वाजता आणि महाआरंभ 'देवमाणूस २' रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

SCROLL FOR NEXT