Suniel Shetty Esakal
मनोरंजन

Suniel Shetty: 'अण्णा, तू घरी जा आणि..', पहिल्या सिनेमानंतर सुनील शेट्टीवर झालेली सडकून टीका..

सुनील शेट्टीनं नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या करिअरमधील काही हैराण करणारे किस्से सांगितले आहेत.

प्रणाली मोरे

Suniel Shetty: बॉलीवूड अभिनेता सुनिल शेट्टीनं 'बलवान' सिनेमातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत तीन दशकाच्या करियरमध्ये त्यानं जवळपास एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे दिले आहेत. पण त्याच्या पदार्पणातील सिनेमाचा रिव्ह्यू लिहिला गेला होता ज्यात म्हटलं होतं की 'अण्णा तू घरी जा आणि ईडली विक'.

हेराफेरी अभिनेता सुनिल शेट्टीनं यासंदर्भातील किस्सा एका मुलाखतीत ऐकवला होता. त्यानं सांगितलं होतं की त्याचा पदार्पणातील सिनेमा हिट झाला होता आणि एक अॅक्शन हिरो म्हणून त्याला स्विकारलं गेलं होतं. त्यावेळी एका क्रिटिक्सनं त्याच्यासाठी लिहिलं होतं की, 'घरी जा आणि ईडली विक'. सुनिल शेट्टीनं म्हटलं होतं की-'हे जे बोललं गेलं होतं ते योग्य नव्हतं. कारण त्यावेळी प्रत्येक मुलाला वाटलेलं की पुढचा अमिताभ बच्चन मीच आहे'. (Suniel shetty after his debut film a critic wrote for him that go back to home)

सुनील शेट्टीनं आपल्या व्यक्तीमत्त्वाविषयी बोलताना अंडरवर्ल्ड संदर्भातील किस्से सांगितले आहेत. त्यानं कसं त्या दिवसांत बॉलीवूडमध्ये राहून अंडरवर्ल्डशी डील केलं होतं याचा खुलासा केलाय.

सुनील म्हणाला की,'' त्यावेळी सिनेमात मी आलो होतो तेव्हा मुबंईमध्ये अंडरवर्ल्डचा दबदबा होता. त्याला धमक्यांचे कॉल यायचे पण तो फोन करणाऱ्यावर चांगल्या कडक अंदाजात पलटवार करायचा. पोलिसांनी देखील सांगितलं होतं की तू क्रेझी आहेस..तु असं करू नकोस. पण सुनील अडून राहिला..त्याला कोणत्याही चुकीच्या कामाचा भाग बनायचं नव्हतं आणि पोलिस त्याचं संरक्षण करतील यावर त्याचा ठाम विश्वास होता. म्हणूनच तो गुंडांना त्यांच्याच अंदाजात उत्तर देणं पसंत करायचा''.

सुनीलच्या कुटुंबाला तो काय करतोय याच्यात काही चुकीचं वाटायचं नाही. त्यांचा त्याच्यावर विश्वास होता. सुनीलनं आपली मुलं अथिया,अहानला देखील आपल्या अनेक गोष्टी सांगितलेल्या नाहीत. त्यानं आयुष्यात काही उलट-सुलट कामं केली,त्याला दुखापत झाली आणि त्यातनं तो स्वतः ठीक देखील झाला. वेळ सगळं काही ठीक करते..सगळ्यावर काळ उत्तम औषध आहे असं सुनीलला वाटतं.

वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर सुनील शेट्टी लवकरच आयकॉनिक 'हेरा फेरी' फ्रॅंचाईजीचा पुढचा सिनेमा शूट करत आहे. या तिसऱ्या सीरिजमध्ये त्याच्यासोबत परेश रावल आणि अक्षय कुमार असणार आहेत. या तिघांना या आधीच्या भागात प्रेक्षकांनी पसंत केलेलं आहे. लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

Kolhapur Shivaji University: पदव्युत्तर अभ्यासकेंद्रांना कुलूप, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी महाविद्यालयांचा प्रस्ताव

Jaykumar Rawal : तोंडाला फेस आणणारी घोडदौड; दोंडाईचा निवडणुकीत नगराध्यक्षपद व ७ जागा बिनविरोध, मंत्री जयकुमार रावल यांचा वरचष्मा

SCROLL FOR NEXT