Sunil Grover Instagram
मनोरंजन

Sunil Grover: कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर दूध विकताना दिसला कॉमेडियन, सुनिल ग्रोव्हरला लोक म्हणू लागले..

कॉमेडियन सुनिल ग्रोव्हरचा बाईकवरनं दूध विकतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Sunil Grover: गुत्थी आणि डॉ. गुलाटी यांची नावे समोर येताच लोकांच्या मनात एकच नाव येते ते म्हणजे सुनील ग्रोवरचे. अभिनेता असण्यासोबतच सुनील एक उत्तम कॉमेडियन देखील आहे. कॉमेडीसोबतच गंभीर भूमिकांमध्येही सुनीलला खूप पसंत गेले आहे. टीव्हीपासून फिल्म इंडस्ट्रीपर्यंत सुनिल ग्रोव्हर हे एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

(Sunil Grover shared his photo can be seen selling milk in winter fans reacted)

'द कपिल शर्मा शो'नंतर प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झालेला सुनील ग्रोव्हर त्याच्या सोशल मीडियावर काहीतरी मजेशीर शेअर करत असतो. आता जरी तो या शोचा भाग नसला तरी त्याच्या कॉमेडी भूमिकांनी लोकांच्या हृदयात पक्कं स्थान निर्माण केलं आहे. त्याची फॅन फॉलोइंग पण तगडी आहे. त्याने एक मजेशीर फोटो शेअर केला आहे .

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

सुनील ग्रोव्हर हा एक कॉमेडियन आहे. केवळ शो मध्येच नाही तर रियल लाईफ मध्ये देखील तो खुप विनोदी आहे. अनेकदा सोशल मीडियावर तो मजेदार व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो, ज्यावर लोक खूप प्रतिक्रिया देत असतात.

नुकताच त्याने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो दूध विकताना दिसत आहे. सुनीलने हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये तो जॅकेट आणि हिवाळ्यात घालतात तशी कानटोपी घालून दूधवाल्याच्या बाईकवर बसलेला दिसत आहे.

बाईकच्या दोन्ही बाजूला दुधाचे मोठे कॅन लावलेले दिसत आहेत. सुनील जणू दूध विकण्यासाठी निघाल्याचं या फोटोवरून भासत आहे. या फोटोसोबत त्याने एक मजेदार कॅप्शनही दिले आहे. त्यांने लिहिलेय - 'दूध मचाले'.

सुनील ग्रोव्हरचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे. त्याच्या चाहत्यांना हा फोटो खूप आवडताना दिसत आहे आणि ते कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

एका युजरने कमेंट केली आहे की, 'भाऊ तुम्ही एक लिटर दूध कसे देता?' तर आणखी एकानं लिहिलं आहे की, 'सर, कोणतेही काम छोटे नसते, तुम्ही विका, आम्ही खरेदी करतो'. आणखी एका यूजरने 'द कपिल शर्मा शो'च्या स्टाईलमध्ये लिहिले, 'DGDW: डॉक्टर गुलाटी दूध वाले'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT