Sunny Hinduja news esakal
मनोरंजन

Sunny Hinduja: 'संदीप भैय्या' आता मल्याळम चित्रपटातून करणार डेब्यू! 'तंत्र मंत्र' करताना दिसणार, पोस्टनं वेगळ्याच चर्चेला उधाण

टीव्हीएफच्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये सनी हिंदूजा चमकला होता. त्यानं साकारलेली संदीप भैय्याची व्यक्तिरेखा कमालीची लोकप्रिय झाली होती.

युगंधर ताजणे

Sunny Hinduja debut : ओटीटी मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या अॅस्पिरंटस मालिकेतील प्रमुख कलाकार सनी हिंदूजा आता मल्याळम चित्रपटातून डेब्यू करणार आहे. 'संदीप भैय्या' म्हणून सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या संदीप भैय्याचा चाहतावर्ग मोठा आहे. खासकरुन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 'संदीप भैय्या' विशेष लोकप्रिय आहे.

सध्या सनी हिंदूजाची वेगळ्या कारणासाठी चर्चा होत आहे. त्याचे कारण त्याचे मल्याळम चित्रपट विश्वातून होणारे डेब्यू. त्यानं इंस्टावर खास पोस्ट शेयर करुन त्याविषयी माहिती दिली आहे. अॅस्पिरंट असो किंवा संदीप भैय्या त्यातून सनी हिंदूजाची मोठी क्रेझ दिसून आली आहे. यातून त्यानं स्वताचा खास असा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. यानंतर तो नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध अशा द रेल्वे मॅन नावाच्या मालिकेत देखील दिसला होता. त्यात त्यानं एका निर्भिड अशा पत्रकाराची भूमिका साकारली होती.

आता संदीपच्या इंस्टावरुन त्याच्याविषयीची एक मोठी बातमी समोर येत आहे तो हॅलो मम्मी नावाच्या मल्याळम चित्रपटातून दिसणार आहे. त्यानं त्याच्या पहिल्या मल्याळम चित्रपट हॅलो मम्मीमधील एक पोस्ट शेयर करत त्यातून तंत्र विद्येचे ज्ञान असणारा व्यक्ती म्हणून स्वताला प्रेझेंट केले आहे. सनीच्या त्या लूकची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. याविषयी त्यानं चाहत्यांशी संवाद देखील साधला आहे.

तो म्हणतो की, मल्याळम चित्रपट विश्वामधून पदार्पण करणं हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव आहे. त्यासाठी मी मल्याळम चित्रपट प्रेमींचा खूप खूप आभारी आहे. मला आशा आहे की, माझी त्या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना आवडेल. ते तिचे कौतुकही करतील. सनीच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

यापूर्वी देखील सनीच्या द रेल्वे मॅनमधील भूमिकेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. ओटीटीवर आपल्या नावाची वेगळी छाप त्यानं उमटवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या डेब्यूची चर्चा रंगली होती. अखेर तो साऊथ चित्रपट विश्वातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. चाहत्यांना त्याच्या या प्रोजेक्टची मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वत:च्या भावाचे ७ नगरसेवक फोडायला ठाकरेंनी किती खोके दिले? राज ठाकरेंचं नाव घेत भाजपचा राऊतांना सवाल

8th Pay Commission Explained: पगार किती वाढणार? उशिरा लागू झाला तर थकबाकी किती मिळेल? पगारवाढीचं संपूर्ण गणित उघड

New Year Trip: नवीन वर्षात स्वस्तात फिरायचंय? मग मुंबईकरांनी 'ही' मस्त ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा

Share Market IPO : गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! या आठवड्यात येत आहेत 4 नवे IPO; कोणते आणि कधी ते जाणून घ्या!

India vs Malaysia : 4,4,4,4,4,6,6,6 : वैभव सूर्यवंशीचं वादळी अर्धशतक, मलेशियन गोलंदाजांना दिला चोप, पण...

SCROLL FOR NEXT