Sunny Video esakal
मनोरंजन

Sunny Leone Video : किती तो नाटकीपणा, एवढंस काय लागलं पण सनीनं अख्खा सेट डोक्यावर घेतला!

आता बॉलीवूडमध्ये सनी प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. एरवी तिच्या वेगवेगळ्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणाऱ्या सनीवर नेटकऱ्यांचे नेहमीच लक्ष असते.

सकाळ डिजिटल टीम

Sunny Leone : आता बॉलीवूडमध्ये सनी प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. एरवी तिच्या वेगवेगळ्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणाऱ्या सनीवर नेटकऱ्यांचे नेहमीच लक्ष असते. काही वर्षांपासून सनीनं बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

सनी ही काही दिवसांपासून तिच्या ओ माय घोस्ट या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. बोल्ड अँक्टिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीला या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका मिळाली आहे. चित्रिकरण सुरु असताना सनीला छोटीशी दुखापत झाली. मात्र त्यावरुन तिनं जो गोंधळ केला त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. चाहत्यांनी देखील सनीला त्यावरुन चांगलेच टोकले आहे. काय सनी तुला दुखापत झाली किती तू त्याचा बाऊ किती करतेस असा प्रश्न तिला नेटकऱ्यांनी विचारला आहे.

Also Read - 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

सनी नेहमीच आपण चर्चेत कसे राहू यावरून सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिनं शेयर केलेल्या फोटोशुटला देखील नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तिच्या लेटेस्ट पोस्टमध्ये सनीच्या पायाला दुखापत झाली. त्यावेळी तिथे असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीनं तिला प्रथमोपचार देण्यासाठी घाई केली. यासगळ्यात सनीचा तो आवेश मात्र अनेकांच्या चर्चेचा विषय होता.

तो व्हिडिओ शेयर करताना सनी म्हणते, अगोदरच मला कोरोनाची भीती त्यात पुन्हा अशाप्रकारे अपघात झाल्यानं काय करावं हेच कळेनासे झाले आहे. त्यामुळे मी तर घाबरुन गेले आहे. सेटवर काळजी घेणं जास्त महत्वाचे आहे. आता मला टीम म्हणते तुम्हाला इंजेक्शन घ्यावचं लागेल. असं जे कुणी म्हणत आहेत त्यांना मला सांगायचे आहे, मला घाबरू नका. मी काही झालं तरी इंजेक्शन घेणार नाही. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT