Mera Piya Ghar Aaya 2.0: Sunny Leone Mera Piya Ghar Aaya 2.0 Song:  Esakal
मनोरंजन

Mera Piya Ghar Aaya 2.0: कुठं माधुरी कुठं सनी, काय आहे का नाही? "मेरा पिया घर आया 2.0" वरुन सनीवर नेटकऱ्यांची आगपाखड

Vaishali Patil

Sunny Leone Mera Piya Ghar Aaya 2.0 Song: माधुरी दीक्षित ही बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री आहे. तिने आजवर बऱ्याच हिट चित्रपटातुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिचा 1995 साली 'याराना' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

दिग्दर्शक डेविड धवन या चित्रपटातील 'मेरा पिया घर आया' हे गाणे खूप लोकप्रिय झाले. या गाण्यात माधुरीने तिच्या अप्रतिम नृत्याने सर्वांनाच वेड लावले होते. आता माधुरीच्या या आयकॉनिक गाण्याचा रिमेक करण्यात आला आहे.

तब्बल 28 वर्षांनंतर बी टाऊन अभिनेत्री सनी लिओनीने 'मेरा पिया घर आया' या गाण्याचा रिमेक तयार केला आहे जो आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सनी लिओनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या " मेरा पिया घर आया 2.0 " ने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

माधुरी दीक्षित नेने यांच्यावर चित्रित केलेल्या आयकॉनिक ट्रॅक च्या नव्याकोऱ्या म्युजिक व्हर्जन ने रसिकांची मने जिंकली आहेत.

सनीने यापुर्वीही बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम साँग केले आहेत. त्याचबरोबर सनीने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही तिच्या नृत्याची झलक दाखवली आहे.

आता सनी लिओनीने आता बॉलिवूड सुपरस्टार माधुरी दीक्षितच्या 'मेरा पिया घर आया' या सुपरहिट गाण्याचा रिमेकने सर्वांना धक्का दिला आहे.

सनीचा हा क्लासिक ट्रॅक काही तासातच व्हायरल झाला आहे. तिच्या चाहत्यांनी या गाण्याला खुप पसंती दिली आहे.

मात्र माधुरी दीक्षितच्या चाहत्यांना सनीचे हे नवीन गाणं काही खास आवडलेलं नाही. अनेकांनी या रिमेक गाण्यावर टीका केली आहे. तर बऱ्याच नेटकऱ्यांनी सनी आणि माधुरीची तुलना केली आहे.

'केनेडी' मध्ये तिला जागतिक स्तरावर ओळख मिळाल्यानंतर आता सनी "कोटेशन गँग" या तमिळ चित्रपटात चमकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TVK MLA Ban: टीव्हीके आमदाराला विधानसभेत प्रवेश बंदी; विश्वासदर्शक ठरावापूर्वी विजय सरकारला मोठा धक्का

Pune Nasrapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरण : चिमुरडीच्या शरीरावर गंभीर जखमा, आरोपीची तपासात उडवाउडवीची उत्तरे; पोलिसांचा न्यायालयात मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी मूळचा अहिल्यानगरमधील, दुसरा आरोपी पुण्यातला

Sangli Police : सांगली पोलिसांचा संतापजनक प्रकार! संशयित समजून दोघा चुलत भावांना विवस्त्र करून बेदम मारहाण, आमदार जयंत पाटलांनी केली विचारपूस

Bibvewadi Fire : बिबवेवाडीत भीषण आगीत मंडप साहित्याचे गोदाम भस्मसात; दोन ट्रकसह सात दुचाकी खाक, मोठी जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT