sunny leoni  Team esakal
मनोरंजन

डोक्याला फुगे बांधुन सनीचा 'हिडन' बर्थ डे, व्हिडिओ व्हायरल

सनीनं (sunny) नुकताच आपला 40 वाढदिवस साजरा केला.

युगंधर ताजणे

मुंबई - सोशल मीडियावर (active on social media) अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी तसेच आपल्या अदाकारीनं बॉलीवूडमध्ये (bollywood) वेगळी ओळख निर्माण केलेली सनी लिओनी (sunny leoni) नेहमीच चर्चेचा विषय असते. तिची प्रत्येक गोष्ट वेगळी असते. तिचे फोटो, स्टाईल, नवा लूक, फिटनेस याबद्दल चाहत्यांचा जास्तीत जास्त प्रतिसाद कसा मिळेल याकडे तिचे लक्ष असते. तिन आपल्या बर्थ डे (birthday) निमित्तानं चाहत्यांना एक आगळे वेगळे गिफ्ट दिले आहे. तिच्या त्या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. (sunny leone shares hidden video of birthday celebration shows funny style)

सनीनं (sunny) नुकताच आपला 40 वाढदिवस साजरा केला. त्याला तिच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सनीनं एका हटक्या व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना गिफ्टही (video share on social media) दिले आहे. त्या व्हिडिओमध्ये सनी गंमतीशीर मुडमध्ये दिसत आहे. तिनं आपल्या डोक्याला पिवळ्या रंगाचे फोटो बांधले आहे. त्या व्हिडिओला शेअर करताना आणि त्याला कॅप्शन देताना तिनं लिहिलं आहे, हिडेन बर्थ डे.

सनीच्या त्या फनी व्हिडिओला तिच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. आतापर्यत साडेसहा लाखांपेक्षा अधिक जणांनी तो व्हिडिओ पाहिला आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह असणा-या सनीच्या पोस्टला चाहत्यांची नेहमीच पसंती मिळत असते. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. सनीचं फोटोशुट हा तिच्या चाहत्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी सनीनं तिच्या इंस्टावरुन तिच्या आगामी प्रोजेक्टचे फोटोही शेअर केले होते.

त्या फोटोंमध्ये सनी त्या शो चा स्टार रणविजय सिंग यांच्यासोबत दिसत आहे. फोटोमध्ये व्हाईट कलरचा टी शर्ट आणि रेड कलरचा स्कर्ट तिनं परिधान केला आहे. तर रणविजयनं व्हाईट कलरचा टी शर्ट आणि त्याच्यावर एक ब्लेजर घातला आहे. सनीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती विक्रम भट्ट य़ांच्या अनामिका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ही मालिका विक्रम भट्ट आणि कृष्णा बट्ट यांच्या लोनरेंडर कंपनीनं तयार केली आहे. मॅक्स प्लेयरवर ती प्रदर्शित केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT