Rhea Chakraborty Love Life: Esakal
मनोरंजन

Rhea Chakraborty: सुशांतनंतर रिया पुन्हा प्रेमात! 'या' बिझनेसमनला करतेय डेट...झिरो मधून उभारलंय साम्राज्य

रिया एका वेगळयाच कारणासाठी चाहत्यांच्या चर्चेचा विषय झाली आहे. तो विषय म्हणजे तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड.

Vaishali Patil

Rhea Chakraborty : बॉलीवूडचा प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात अनेक खुलासे झाले. मात्र या प्रकरणात जास्त चर्चेत झाली ती त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली होती. त्यानंतर तिच्या नावाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होती. नेटकऱ्यांनी देखील तिच्यावर कडाडून टीका केली होती.

रिया आणि सुशांत बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया बराच काळ चर्चेत होती. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. आता रिया तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे.

सध्या ती एका टिव्ही शोमध्ये जजची भुमिका साकारत आहे. मात्र आता ती पुन्हा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आता रियाच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाने एंट्री केल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. रिया ही आता एका बिझनेसमनला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

आता रियाचं नाव ज्यांच्याशी जोडलं जातय तो आहे बिझनेसमन निखिल कामत. मीडिया रिपोर्टनुसार, हा निखिल हा जेरोधा या वित्तीय सेवा कंपनीचा संस्थापक आहे. आता रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात निखिलच्या माध्यमातुन प्रेमाची एन्ट्री झाली आहे.

मात्र अद्याप रिया किंवा निखिल कामत या दोघांनीही या अफवांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे तर ते दोघेच सांगू शकतात.

यापुर्वी रियाचं नाव हे क्रिकेटर विराट कोहलीचा मॅनेजर 'बंटी सजदेह' याला याच्यासोबत जोडलं गेलं होतं. बंटी सजदेह हा सलमान खानची वहिनी सीमा सजदेहचा भाऊ आहे. त्यानंतर आता तिच नाव निखिलसोबत जोडलं जात आहे.

तर दुसरीकडे निखिल हा रियाला डेट करण्यापूर्वी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला डेट करत होता. त्यादोघांचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मानुषी आणि निखिल एक वर्षापासून डेट करत होते.

आजकाल रिया चक्रवर्ती रोडीज या रिअॅलिटी शोमध्ये गँग लीडरची भूमिका साकारताना दिसत आहे. आता त्यातच तिच्या लव्ह लाईफबद्दल ही एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT