sushant 
मनोरंजन

सुशांत सिंग राजपुत-अंकिता लोखंडे ही प्रसिद्ध जोडी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळवृत्तसेवा

मुंबई- लॉकडाऊनमध्ये अनेक मालिकाचं पुनःप्रक्षेपण प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सुरु करण्यात आलं आहे. यात हिंदी मराठीमध्ये गाजलेल्या अनेक मालिका आहेत. महाभारत आणि रामायण नंतर अनेक मालिकांनी हा निर्णय घेतला. यातंच आता भर पडली आहे ती एका प्रसिद्ध हिंदी मालिकेची. होय सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. टीव्ही मालिका पवित्र रिश्ता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'पवित्र रिश्ता' या सुपरहिट मालिकेचा सिक्वेल वगैरे येत असेल असा जर तुम्ही अंदाज बांधत असाल तर तसं काही नाहीये. लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी प्रेक्षकांची आवडती मालिका पुनःप्रसारित करण्याचा निर्णय वाहीनीने घेतला आहे. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यातंच प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी कथा असल्याने प्रेक्षकांचा चांगला कनेक्ट होता.

या मालिकेदरम्यान दोघेही ख-या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र नंतर काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. या दोघांच्या केमिस्ट्रीने पवित्र रिश्ता ही मालिका प्रेक्षकांनी उचलून धरली होती.या मालिकेनंतर सुशांत सिनेमा करण्यामध्ये व्यस्त झाला तर अंकिताने देखील मालिकांपासून ब्रेक घेत कालांतराने सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. आज दोघेही यशाच्या शिखरावर आहेत मात्र त्यांच्या करिअरसाठीही ही मालिका महत्वाची ठरली होती.

या मालिकेने त्यांचा चेहरा घराघरात पोहोचला. त्यामुळे आता या लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा हे दोघेही या मालिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहेत. पवित्र रिश्ता ही मालिका सोमवार ते शुक्रवार दुपारी ३ वाजता झी टीव्हीवर पुनःप्रक्षेपित केली जाणार आहे.  

sushant singh rajput and ankita lokhande show pavitra rishta will be shown once again  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCची तिजोरी प्रचंड! ७४ हजार कोटींच्या अर्थसंकल्पावर लक्ष, मुंबई जिंकण्यासाठी लढाई तीव्र

Latest Maharashtra News Updates Live: अंधेरी पश्चिम विधानसभेत काँग्रेसला मोठा धक्का

Jowar Matar Kachori : ज्वारीच्या पिठाची हेल्दी मटार कचोरी ट्राय करा; चव अन् आरोग्य मिळेल दोन्ही!

Viral Video : पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरुन तरुणीचे दिवसाढवळ्या अपहरण, सरंक्षण मागायला आली अन्... थरारक व्हिडिओ

Video: सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा उत्साह बघा! पंकजा मुंडेंनीही मग धरला ठेका

SCROLL FOR NEXT