Sushant Singh Rajput Esakal
मनोरंजन

Sushant Singh Rajput Death Anniversary: कोडे सुटेना! तीन वर्ष झालीत तरीही न्याय मिळेना! चाहते अजूनही प्रतीक्षेत

Vaishali Patil

बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याची वेदना चाहत्यांना अजूनही कमालीची अस्वस्थ करते. आपल्या अभिनयानं चाहत्यांना मनमोक्त आनंद देणाऱ्या या अभिनेत्यानं केलेली आत्महत्या हा नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी धक्का राहिला आहे.

त्याच्या मृत्यूला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या तीन वर्षांत त्यांच्या चाहत्यांनी आणि कुटुंबीयांनी त्यांचा विसर कधीच पडू दिला नाही. कधी सोशल मीडियातून तर कधी एखाद्या इव्हेंटच्या माध्यमातून तो नेहमी सर्वांच्या स्मरणात राहतो.

सुशांत सिंग राजपूत हा त्या बॉलीवूड स्टार्सपैकी एक आहे ज्याने खूप कमी वयात अनेक यश मिळवले. यासोबतच त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपटही दिले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

‘काई पो छे’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारा सुशांत त्याच्या पहिल्याच चित्रपटापासून प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला आणि सुशांत सर्वांनाचा लोकप्रिय झाला.

सुशांत कोणतीही भुमिका साकारण्यासाठी खुप मेहनत घ्यायचा यामुळेच त्याने कमी कालावधीत सर्वांच्या मनात घर केल आणि तो यशाच्या शिखरावर पोहचला.

मात्र ही प्रसिद्धी त्याला काहीशी भावली नाही अन् छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत करिअरची सुरुवात करणाऱ्या सुशांतने वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह 14 जून रोजी सापडला आणि दुसऱ्या दिवशी 15 जून रोजी त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाचा तपास आणि आपल्या तपासात याला आत्महत्या म्हटले.

सुशांतच्या मृत्यूनंतर तपासाला अनेक नवीन वळण आले आणि अनेक मोठे प्रश्नही निर्माण झाले. ज्यांची उत्तर अजूनही मिळालेली नाहीत आणि सुशांतसोबत त्याचे चाहते आणि कुटूंब त्याच्यासाठी न्याय मागत आहे.

सुशांतच्या वडिलांनी ही हत्या असल्याचे म्हटले आहे. त्यांनी रिया चक्रवर्ती आणि इतर सहा जणांविरुद्ध पाटणा येथे तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांनी रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा, फसवणूक, पैशांची हेराफेरी यासह आरोप केले होता. तिला अटकही झाली मात्र नंतर तिला जामिन देण्यात आलं.

सोबतच या प्रकरणावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. सर्व राजकीय व्यक्तींनी आणि अभिनेत्री कंगना रणौत सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणावर आवाज उठवला. कंगना आजही सुशांतच्या प्रकरणावर बॉलिवूड इंडस्ट्रीवर अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसते. त्याचे चाहते आजही त्याच्या आठवणीत भावुक होतात.

शेवटी पुन्हा तो प्रश्न उपस्थित होतो की सुशांतचा मृत्यू खून की आत्महत्या. हे गूढ आजही उकललेले नाही. या प्रकरणाचा तपास करणारे सीबीआय अधिकारी तीन वर्षांतही या प्रकरणात कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत.

मात्र, सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात एम्स पॅनलने त्याचा मृत्यू आत्महत्या असल्याचा दावा केला होता. सुशांत सिंग राजपूतचे कुटुंब आणि चाहते आजही त्याच्यासाठी न्यायाची अपेक्षा करत आहेत. तरी आता कधी सुशांतला न्यान मिळेल हे तर वेळच सांगेल..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: पुढील ५ दिवस महत्त्वाचे! नोव्हेंबरमध्येही कोसळणार मुसळधार; हवामान विभागाचा अलर्ट

Latest Marathi News Live Update : शेतकरी आंदोलन थोड्याच वेळात संपणार

Akola News: अकोला जिल्ह्याची सुपीकता घटली; सूक्ष्म अन्नद्रव्यांची तीव्र कमतरता, अभ्यासातून चिंताजनक निष्कर्ष

Female Cancer: तरुण महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण; स्तन कर्करोगाविषयी जागरूकता ही काळाची गरज !

Wardha Crime: नातीने केली आजीच्या घरी चोरी; चोरीच्या मुद्देमालातून खरेदी केली कार, दुचाकी, आयफोन

SCROLL FOR NEXT