sushant in dil bechara 
मनोरंजन

'दिल बेचारा'मध्ये स्वतःच्या अंतिम संस्कारावर बोललेला सुशांतचा 'हा' डायलॉग ऐकून चाहते व्यक्त करतायेत हळहळ

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा'ने लोकांवर जादू केली आहे. सिनेमाच्या सीन्सपासून ते डायलॉगपर्यंत सगळं काही इंटरनेटवर धुमाकुळ घालतंय. या सिनेमाने सुशांतच्या चाहत्यांना हसवलं आणि रडवलं देखील. कित्येक जणांनी सोशल मिडियावर हा सिनेमा पाहताना सुशांतच्या स्वतःच्याच आयुष्याची गणितं मांडत होता असं वाटत असल्याचं म्हटलं आहे. सिनेमात सुशांतचा त्याच्या अंतिम संस्काराशी संबधित एक डायलॉग आहे तो सीन पाहिल्यानंतर चाहते त्यांच्या भावनांना आवर घालू शकत नाहीयेत.

सुशांतच्या 'दिल बेचारा' सिनेमातील डायलॉग्स चाहत्यांमध्ये चांगलेच हिट होत आहेत. सोशल मिडियावर ते त्यांचे आवडते डायलॉग्स पोस्ट करत आहेत. सिनेमात मॅनीची भूमिका साकारणारा सुशांत सिनेमातील एका सीनमध्ये म्हणतो की मला माझ्या अंतिम संस्कार स्वतः हजेरी लावायची आहे. हा सीन पाहताना त्याच्या चाहत्यांच्या डोळे भरुन आले आहेत.

सिनेमात तो मरण्याआधी स्वतःच्या शोकसभेचा एक डेमो ठेवतो. यात त्याचा मित्र आणि किजी त्याच्यासाठी शेवटचे शब्द बोलतात जो ते त्यांच्यासमोर बसून ऐकतो. या सीनला लोक सुशांतच्या मृत्युशी कनेक्ट करत आहेत आणि भावूक होत आहेत. या सिनेमातील अनेक सीन्स आणि डायलॉग्स प्रेक्षकांच्या थेट मनाला हात घालत आहेत.सुशांतचं असं अचानक जाणं कोणालाच न पटण्यासारखं आहे. त्यामुळे सिनेमातील अनेक गोष्टींचा संबंध त्याचे चाहते त्याच्या वास्तव आयुष्याशी जोडत भावूक होत आहेत.

'दिल बेचारा' हा सिनेमा जॉन ग्रीक यांच्या २०१२ मधील 'द फॉल्ट इन अव्हर्स स्टार्स' यावर आधारित आहे. या सिनेमात सैफ अलीखानची खास भूमिका आहे. सुशांतने १४ जूनला आत्महत्या केली. त्याच्या चाहत्यांना हा सिनेमा मोठ्या पडद्यावर रिलीज होण्याची अपेक्षा होती मात्र कोरोनाच्या संकटामुळे ते शक्य होऊ शकलं नाही.   

sushant singh rajput dialogue i want to attend my own funeral made fans teary eyed  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज ठाकरेंचा 'फर्स्ट क्लास' प्रवास! लोकलमध्ये गर्दीच्या वेळेतही मिळाली विंडो सीट, मनसेच्या ७ जणांना बसायलाही जागा

MNS- MVA Morcha: मग लोकसभेत ३१ खासदारांनी मतचोरी केली होती का? मविआ-ठाकरेंच्या मोर्चावर भाजपचा सवाल

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कामांवर 'डिजिटल' नजर! नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाने विकसित केली ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणाली

मोठी बातमी! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २,५४० कोटींची मदत; रब्बी हंगामासाठी १,७६५ कोटींचे पॅकेज जाहीर

Latest Marathi News Live Update : मुंबईतील सत्याच्या मोर्चातून कॉंग्रेसचे बॅनर गायब

SCROLL FOR NEXT