Sushmita Sen Shares Throwback Photo Esakal
मनोरंजन

Sushmita Sen: आज 'त्या' घटनेला 29 वर्षे झाली... भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी सुष्मिता झाली भावुक

Vaishali Patil

Sushmita Sen Shares Throwback Photo: 'मिस इंडिया', 'मिस युनिव्हर्स' आणि कित्येक चित्रपट सुपरहिट देणारी बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही नेहमी चर्चेत असते.

ती नेहमीच लाईम लाइट मध्ये असते. तिनं केवळ आपल्या अभिनयानचं नव्हे तिच्या प्रेमळ स्वभावामुळे लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या सुष्मिताने चाहत्यांची मनंही जिंकली आहेत. सुष्मिता सेनने 1994 मध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता.

21 मे 1994 रोजी सुष्मिता सेनने भारतासाठी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून इतिहास रचला. 42 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत 77 देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता, पण सुष्मिता सेन मुकुटाची मालकिन बनली होती.

फिलिपाइन्समध्ये झालेल्या ४३व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची सुष्मिता विजेती होती. हा विजय देखील मोठा होता कारण सुष्मिता ही हे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय होती.

आज या घटनेला 29 वर्षे झाली. सुष्मिता सेनने सुमारे तीन दशकांपूर्वीचा स्वतःचा एक मोनोक्रोम फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

क्लोजअप फोटोमध्ये सुष्मिता चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला हात ठेवून कॅमेराकडे पाहत आहे. सुष्मिताने फोटोसोबत एक लांबलचक पोस्टही लिहिली आहे.

तिनं लिहिलं, 'हा फोटो अगदी 29 वर्षे जुना आहे, महान व्यक्ती आणि छायाचित्रकार प्रबुद्ध दासगुप्ता यांनी काढला आहे. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी मला सुंदरपणे फोटोत कैद केलं. हसत हसत म्हणाला, तुला कळलं. तू पहिली मिस युनिव्हर्स आहे... मी अभिमानाने म्हणाली. खरं तर ही भारताची पहिली मिस युनिव्हर्स आहे.'

आपला आनंद व्यक्त करताना ती म्हणाली की तिने आपल्या मातृभूमीचे प्रतिनिधित्व केले आहे ही आपल्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. आजही माझे डोळे आनंद अश्रू आहे.

मिस युनिव्हर्स जिंकल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर ती बॉलिवूडकडे वळली.

सुष्मिता लवकरच आर्य सीझन 3 मध्ये दिसणार आहे जो Disney+Hotstar वर स्ट्रीम होईल. सुष्मिता सेनने आर्यामधून ऑन-स्क्रीन कमबॅक केलं आहे.

याशिवाय तिच्याकडे ट्रान्सजेंडर श्री गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित 'ताली' हा प्रोजेक्टही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup सामन्यात फुल राडा! विदर्भाचा गोलंदाज अन् दिल्लीकर फलंदाज एकमेकांच्या अंगावर गेले धावून, पाहा Viral Video

Latest Marathi News Live Update : आठवले गटाचा दणका आंदोलनाची घेतली दखल

Shahu Maharaj: 'हे' दोन मराठा तरुण होते म्हणून औरंगजेब बालछत्रपतींचे धर्मांतर करु शकला नाही, जाणून घ्या त्यागाचा इतिहास

Avoid Junk Food: आकर्षक पॅकेजिंग, चमचमीत चवीला म्हणा 'नो'! घरीच बनवलेल्या पौष्टिक पर्यायांनी जपा आरोग्य

Jaggery Health Benefits: दररोज सुपारीएवढा गूळ देतो ताकद, शुद्धी आणि आरोग्याचे चांगले फायदे

SCROLL FOR NEXT