मनोरंजन

सुष्मिता सेनच्या नवीन वेब सीरिज 'आर्या'चा टीझर झाला रिलीज; एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसली सुश्मिता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : या वर्षाच्या सुरुवातीला सुश्मिता सेनच्या कमबॅकच्या बातम्या आल्या होत्या. पण ती सध्यातरी अभिनय चित्रपटात नव्हे तर डिजिटल जगात पदार्पण करणार आहे.  आर्या या वेबसिरीजमध्ये सुश्मिता दिसणार आहे. सुश्मिता खूप दिवसांपासून आर्या सिरीज पाहण्याची वाट पाहात होती. आता तिने स्वतःच पहिली झलक म्हणजे टीझर दाखवला. म्हणजे सुश्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आर्यचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर काही सेकंदांचा आहे, पण तो पाहून तुम्हांला त्याच्या स्टोरीबद्दल नक्की अंदाज येईल.

या टीझरमध्ये सुश्मिता दोरीवर चढताना दिसली आहे. तिच्या भूमिकेविषयी मिळालेल्या माहितीनुसार ती क्राइम डिटेक्टिवच्या भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसीरिज राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. याचे दिग्दर्शन राम माधवानी करीत असून, ज्याचे शूटिंग डिसेंबर 2019 मध्ये सुरू झाले. या मालिकेत सुश्मिता आर्याची भूमिका साकारत आहे. ही मालिका लवकरच डिस्ने आणि हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

अनेक चित्रपटांमध्ये अभिनयाची छाप सोडणारी सुश्मिता अखेर अनीस बज्मीच्या नो प्रॉब्लेममध्ये दिसली होती. यानंतर सुश्मिता हिंदी चित्रपटातून गायब झाली होती. पण आता चाहत्यांना तिला परत अभिनय करताना पाहून आनंद होईल यात शंका नाही. सुश्मिता या नवीन मालिकेतून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.

 अर्षद वारसीनं मुख्यमंत्र्यांचं केलं कौतुक, ट्विट करुन म्हणाला...

महिलांनो.. ही बातमी खास तुमच्यासाठी; घरबसल्या पैठणी जिंकण्याची संधी मिळणार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT