sushmita rohit 
मनोरंजन

सुष्मिताचं रोहित रॉयशी अफेअर होतं का?

रोहित रॉयने लिहिली पोस्ट

स्वाती वेमूल

अभिनेता रोहित रॉयने Rohit Roy सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट करून अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या Sushmita Sen आठवणींना उजाळा दिला आहे. १९९४ मध्ये सुष्मिताने 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकल्यानंतर एका जाहिरातीत हे दोघं एकत्र झळकले होते. त्या जाहिरातीच्या काही आठवणी फोटोंच्या स्वरुपात रोहितने शेअर केल्या आहेत. त्यावेळी रोहितला डेट करतेय का, असा सवाल सुष्मिताला अनेकांनी केल्याचंही त्याने सांगितलं. (Sushmita Sen was asked if she is dating Rohit Roy after their first ad together)

जाहिरातींमधील फोटोंचा कोलाज रोहित रॉयने पोस्ट केला आहे. त्यावेळी रोहितने नुकतंच मॉडेलिंगला सुरुवात केली होती आणि दुसरीकडे सुष्मिताने 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकला होता. दोघंही जाहिरातीच्या इंडस्ट्रीत नवीन होते. 'माझी प्रिय सुष्मितासोबत करिअरमधील पहिली जाहिरात. मी तिचा बॉयफ्रेंड आहे का, असा प्रश्न तिला अनेकांनी मुलाखतींमध्ये विचारला होता. अभिनेता म्हणून मी तेव्हासुद्धा खूप चांगला होतो', असं कॅप्शन रोहितने या कोलाज फोटोंना दिलं आहे.

याआधी सुष्मिताचा एक जुना व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अमेरिकेत भाषण देण्यापूर्वी तयारी करणाऱ्या १८ वर्षीय सुष्मिताचा हा व्हिडीओ होता. सौंदर्यस्पर्धांमधून बॉलिवूडकडे वाटचाल करणाऱ्या सुष्मिताने तिच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. काही वर्षे ब्रेक घेतल्यानंतर तिने 'आर्या' या वेब सीरिजमधून पुनरागमन केलं. या सीरिजमधील तिच्या अभिनयाचं पुन्हा एकदा कौतुक झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT