Sushmita Sen with his Younger brother Rajeev Sen Google
मनोरंजन

भावामुळे सुश्मिता सेन तणावात

सोशल मीडियावर सुश्मिता सेनच्या वहिनीनं केलेल्या 'त्या' पोस्टमुळे चर्चेला वेगळं वळण मिळालंय.

प्रणाली मोरे

बॉलीवूड(Bollywood) अभिनेत्री सुश्मिता सेन(Sushmita Sen)चा लहान भाऊ राजीव सेन यानं टी.व्ही अभिनेत्री चारु असोपा सोबत काही वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. काही महिने अगोदरच राजीव आणि चारुला कन्यारत्नाचा लाभ झाला आणि त्यांनी एका मुलीचे पालक म्हणून नव्या जर्नीला सुरुवात केली. राजीव आणि चारुनं आपल्या मुलीसोबतचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या फोटोंना, लहान मुलीला नेटकऱ्यांनी भरभरुन प्रेमाचा प्रतिसाद दिला. पण आता बातमी कानावर पडतेय की राजीव आणि चारु मध्ये काहीतरी बिनसलं आहे. राजीवने आपली बायको आणि मुलीसोबतचा एक फोटो आपल्या युट्युब चॅनलवर शेअर करीत एक पोस्ट टाकली आहे. आणि या फोटोवरनं लोकांनी अंदाज बांधला आहे की राजीव आणि चारुमध्ये दुरावा आला आहे.

Rajeev Sen Post for daughter

चारु असोपा काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी गेली आहे. ती सध्या राजस्थानमधील बिकानेर शहरात आहे. राजीवने आपल्या युट्युब चॅनेलवर पत्नी चारु आणि मुलीचा फोटो पोस्ट करीत लवकरच मुलीसोबत रहायला मिळेल आणि मी तिच्यासोबत खेळेन अशी ईच्छा व्यक्त केली आहे. राजीवने लिहिलंय,''जियाना,आपल्या वडिलांच्या घरी लवकर ये,जास्त प्रवास करणं तुझ्यासाठी चांगलं नाही. खूप दिवसांपासून तुला पाहिलं नाही आहे. आता लवकर ये आणि माझ्यासोबत खेळ''.

आणखी एक बातमी समजतेय की राजीवची पत्नी चारुनं आपला वाढदिवसही त्याच्याशिवाय साजरा केला आहे. तिनं मुलीसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,''हा वाढदिवस माझ्यासाठी खूप खास आहे. देवानं मला खूप मोठं गिफ्ट दिलं आहे तुझ्या रुपात. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,बेटा''. याआधी २०२० मध्ये राजीव आणि चारुमधील नातं बिघडल्याच्या बातम्या कानावर येत होत्या.

दोघांमधील मतभेद हे कारण त्यावेळी समोर आलं होतं. मीडियाला मिळालेल्या बातमीनुसार राजीव दोघांमधील तणावामुळे त्या दिवसांत त्याच्या दिल्ली येथील घरी राहत होता. तर चारु मुंबईमधील आपल्या घरी राहत होती. राजीव सेन आणि चारुनं ७ जून,२०१९ मध्ये गोव्यात लग्न केलं होतं. आता हे सगळं वाचल्यावर एक तर स्पष्ट होतं आहे की, भावाच्या कौटुंबिक आयुष्यातील या तणावाचे पडसाद नक्कीच सुश्मिताच्या आयुष्यावरही पडले असणारंच. कारण सुश्मिता आणि राजीव एकमेकांशी खूप चांगलं बॉन्डिंग शेअर करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Election Result: 'तो' शब्द धनंजय मुंडेंनी खरा करुन दाखवला; परळीत मारली बाजी, तर गंगाखेडची जागा...

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: गडचिरोली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या ॲड. प्रणोती निंबोरकर विजयी

Siddhi Vastre : २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे बनली नगराध्यक्ष, शिवसेनेचा मोहोळ नगरपरिषदेत मोठा विजय

Nagar Parishad Election Result : 'साम टीव्ही'चा एग्झिटपोल तंतोतंत खरा! नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष; महाविकास आघाडीला किती जागा?

Municipal Council Election: सत्तेचा खेळ महायुतीने जिंकला! मविआला नगरपरिषदांमध्ये जबर धक्का बसला; आघाडीचा डाव नेमका कसा फसला?

SCROLL FOR NEXT