swanandi tikekar engagement photos viral fans comment on photo marathi actress SAKAL
मनोरंजन

Swanandi Tikekar: कुठेही मेकअपचा भपका नाही... स्वानंदीच्या साखरपुडा फोटोवर असलेली नेटकऱ्याची कमेंट चर्चेत

स्वानंदीच्या साखरपुडा फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. अशातच एक कमेंट मात्र चांगलीच व्हायरल झालीय.

Devendra Jadhav

Swanandi Tikekar Engagement News: स्वानंदी टिकेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. स्वानंदीने नुकतंच गायक - संगीतकार आशिष कुलकर्णी सोबत साखरपुडा केला.

स्वानंदीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. अशातच स्वानंदीच्या साखरपुडा फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. अशातच एक कमेंट मात्र चांगलीच व्हायरल झालीय.

कुठेही मेकअपचा भपका नाही आणि... स्वानंदीच्या फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट चर्चेत

स्वानंदीने काल रविवारी २३ जुलैला साखरपु़ड्याचा फोटो पोस्ट केला. या फोटोवर एका महिलेने जी कमेंट केली आहे ती लक्षवेधी आहे.

युजरने कमेंट केली आहे की.. किती सुंदर दिसत आहात. कुठेही मेकअप चा भपका नाही, अतिशय सोबर पण तितकीच गरजेची ज्वेलरी , आणि सगळ्यात महत्वाचं साडी नेसली आहेस.. खूपच गोड.. अभिनंदन दोघांचे. ही कमेंट सध्या चांगलीच चर्चेत आहे. एकुणच स्वानंदीने साखरपुड्यात पारंपरिक वेशभुषा परिधान केल्याने तिचे फॅन्स खुश झाले आहेत

स्वानंदीने केला साखरपुडा

स्वानंदीने गुपचुप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांना शनिवारीच उधाण आलं. त्याच कारण म्हणजे, स्वानंदीने सोशल मिडीयावर बॉयफ्रेंड आशिष कुलकर्णी सोबत फोटो पोस्ट केला होता. यात स्वानंदीच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसत होती.

दरम्यान स्वानंदीने आज साखरपुड्याचा फोटो शेअर केला. तसेच And We’re Engaged कॅप्शन दिलं आहे.

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीने शुक्रवारी रात्री एक फोटो शेअर केला होता. यात स्वानंदीच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसत होती. तर स्वानंदीचा बॉयफ्रेंड तिच्या गालावर किस करताना दिसतोय.

कोण आहे स्वानंदीचा होणारा नवरा आशिष?

स्वानंदीच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे आशिष कुलकर्णी. This is US! असं लिहून #आमचं ठरलंय असा हॅशटॅग स्वानंदीने वापरलाय. आशिष कुलकर्षी हा गायक - संगीतकार आहे. तो इंडीयन आयडॉल 12 व्या सीझनमध्ये सहभागी होता.

आशिष कुलकर्णी स्वत:चे लाईव्ह शोज सुद्धा करत असतो. आशिष आणि स्वानंदी हे दोघे एंगेज झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

SCROLL FOR NEXT