swara Bhaskar Instagram
मनोरंजन

Swara Bhaskar Birthday: 5 वर्ष लिव्ह-इन मध्ये राहून एका क्षणात 'या' व्यक्तीसोबत स्वरानं तोडलेलं नातं..काय होतं कारण?

काही दिवसांपूर्वीच स्वरानं सपा नेता फहाद अहमदसोबत लग्नगाठ बांधली असून ती आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे.

प्रणाली मोरे

swara Bhaskar: बॉलीवूडची बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिचं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे. अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वीच सपा नेता फहाद अहमद सोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी हे लग्न स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत केलं आहे. अर्थात रजिस्टर मॅरेज केल्यानंतर दोघांनी हिंदू-मुस्लिम धर्माशी संबंधित लग्नाचे पारंपरिक सोहळे देखील सेलिब्रेट केले. प्री-वेडिंग सोहळ्याचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

आज स्वरा भास्कर आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज स्वरा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे.त्यानिमित्तानं चला जाणून घेऊया स्वराच्या आयुष्याशी जोडलेले काही किस्से.

तुम्हाला माहित आहे का स्वरा भास्कर आणि लेखक हिमांशु शर्मा हे दोघे जवळपास ५ वर्ष लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होते. पण लग्नापर्यंत हे नातं पोहोचू शकलं नाही,त्याआधीच नात्याचा दी एन्ड झाला.

समोर आलेल्या एका माहितीच्या आधारे कळत आहे की स्वरा भास्कर आणि हिमांशु शर्मा यांचे लग्नासंबंधित विचार खूप वेगळे होते. आणि म्हणूनच दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला होता. (Swara Bhaskar Birthday special story break up with writer himanshu sharma after 5 years)

जेव्हा स्वरा भास्करला हिमांशुसोबतच्या तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला गेला होता,तेव्हा ती म्हणाली होती,''तुम्ही हिमांशुलाच विचारा. मी एकटीच तर लग्नाचा निर्णय घेऊ शकत नाही''.

बोललं जातं की लग्न न करण्याचा निर्णय स्वराचा होता. जेव्हा हिमांशुनं लग्नाविषयी तिला विचारलं होतं तेव्हा ती म्हणाली होती,''सध्या लग्न तिच्या विचारातच नाही''.

स्वरानं हिमांशुला आपण डेट करत असल्याचं कबूल केलं होतं. ती म्हणाली होती, ''हिमांशु आणि ती एकमेकांना डेट करत आहेत''.

स्वराच्या म्हणण्यानुसार,आता हिमांशु आणि ती दोघे आपापल्या आयुष्यात सुखी आहेत आणि आपापल्या कामावर फोकस करत आहेत. लग्नाविषयी स्वराचं म्हणणं होतं की,''लग्नसंस्थेवर तिचा विश्वास आहे. अनेक लोकांना वाटतं मी धुम्रपान करते,ड्रग्स घेते..पण यात काहीच सत्य नाही. मी एकदम फॅमिलीत रमणारी मुलगी आहे''.

स्वराच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच एका लव्ह स्टोरीत दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत दिव्या दत्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: CSK विरुद्ध काय प्लॅन केला होता? सूर्यवंशीचा खुलासा; वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल म्हणाला, 'केक लावतील म्हणून...'

'माझ्या भावाने मला 'घंटागाडी'....' ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरीला घरी काय नावाने हाक मारतात? अभिनेत्री म्हणाली...

Latest Marathi News Live Update : मंत्री नरहरी झिरवाळ व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

SCROLL FOR NEXT