Swara Bhaskar
Swara Bhaskar  Esakal
मनोरंजन

Swara Bhaskar : 'भारतात राहायचं कशाला? स्वराला कसला आला राग?

सकाळ डिजिटल टीम

Swara Bhaskar bollywood actress tweet viral : स्वराविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. ती जशी प्रसिद्ध अभिनेत्री आहे तशीच ती सतत वादात अडकणारी वादग्रस्त सेलिब्रेटीही आहे. काही दिवसांपासून ती वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचं नुकतेच लग्न झाले आहे. तिनं समाजवादी पार्टीच्या एका नेत्याशी लग्न केले आहे. स्वराच्या लग्नाला विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी उपस्थित होते. त्या सोहळ्यात राहुल गांधीही सहभागी झाले होते.

आता स्वरा तिच्या एका ट्विटमुळे चर्चेत आले आहे. त्यात तिनं थेट आता भारतात का राहायचं असा प्रश्न उपस्थित केला आहे. भारतात राहणं म्हणजे....तिनं आपणच यापूर्वी केलेल्या एका ट्विटचा आधार घेत वेगळ्याच गोष्टीवर आगपाखड केली आहे. तिच्या त्या ट्विटमुळे तिला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोलही केले आहे. तिला अशा विधानामुळे नेमकं काय साध्य करायचे आहे असा प्रश्नही विचारला आहे. स्वरा ही तिचा पती फहाद अहमदमुळे देखील काही काळ चर्चेत आली होती.

Also Read - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

स्वरानं आपल्या त्या व्टिटमध्ये म्हटले आहे की, यापूर्वी म्हटले होते की, तुम्ही तुमची सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवत या देशात राहणे म्हणजे दरवेळी एका निराशाजनक परिस्थितीला सामोरं जाण्यासारखे आहे. अशा देशात राहणे किती अवघड आहे असे प्रकारचे ट्विट करुन स्वरानं नेटकऱ्यांचा राग ओढावून घेतला आहे. स्वरानं त्या ट्विटसोबत एक इमोजी देखील शेयर केला आहे. तिच्या त्या ट्विटवरुन स्वरा मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसत आहे.

स्वरानं या ट्विटमधून आपल्याला देशात राहण्याविषयीच्या परिस्थितीबाबत भाष्य केले आहे. असं तिनं यापूर्वी देखील म्हटले आहे. त्यावेळी ती ट्रोल झाली होती. आताही भारतात राहणे म्हणजे...कशाप्रकारची परिस्थिती आहे हे आपण समजावून घेतले पाहिजे. मी खरं तर यापूर्वी देखील म्हटले आहे. असे म्हणत तिची नाराजी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : पवईत ४ कोटी ७० लाखांची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT