Swara Bhaskar  Esakal
मनोरंजन

Swara Bhaskar: 'भारताला खरं पचत नाही!', ट्विट करत स्वरांन पुन्हा सेन्सॉर बोर्डाचे कान पिळले..

स्वरा भास्करने एक ट्विटही केले आहे, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा वादग्रस्त आणि तितकाच बहूप्रतिक्षित चित्रपट ' भिड ' हा २४ मार्चला रिलीज झाला आहे. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या 'भिड' या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.हा चित्रपट रिलीज होताच चर्चेत आहे.

'भिड' हा चित्रपट रिलिज होण्यापुर्वीच बराच वादात होता. या चित्रपटाचं टिझर रिलिज झाल्यानंतर ते युट्युब वरुन हटवण्यात आलं त्यांनतर या चित्रपटातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणनही काढण्यात आले त्यानंतर या चित्रपटातील जवळपास 13 सीन सेन्सॉर बोर्डाने काढले आहेत.

आता या विषयी स्वरा भास्करनं एक ट्विट केलं आणि या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. स्वरा भास्कर नही याबाबत ट्विट केले आहे. स्वराने चित्रपटाच्या कट शॉट्सबद्दल ट्विट केले आहे, जे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

स्वरा भास्करने तिच्या अधिकृत ट्विटरवर हे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिनं चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर झालेल्या वादानंतर कापण्यात आलेल्या सीन्सचा मुद्दा उपस्थीत करत निशाणा साधला आहे. स्वराने ट्विटमध्ये सेन्सॉर बोर्डावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. 'भारताला वस्तुस्थितीची अ‍ॅलर्जी आहे', असे तिनं म्हटले आहे.

स्वराच्‍या ट्विटला रिप्लाय देताना एका युजरने लिहीले की, मेकर्सना ओटीटीवर अनकट सीनसह चित्रपट रिलीज करू द्या.असं म्हणत तिची बाजू घेतली आहे तर अनेकांनी तिला या देशात इतक्या समस्या वाटतात तर तिनं हा देश सोडून निघुन जावं असा सल्ला तिला दिला आहे.याशिवाय अनेकांनी या ट्विटला स्वराचा नवा प्रचार असंही म्हटलं आहे.

अरुण दीप नावाच्या व्यक्तीच्या ट्विटला उत्तर देताना स्वरा भास्करने हे ट्विट केले आहे. ज्यावर स्वराचे उत्तर आले आहे, त्या ट्विटमध्ये जमावाच्या त्या सर्व दृश्यांचा उल्लेख आहे जे चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहेत.

स्वरानं शेअर केलेल्या फोटोत, प्रमाणपत्र तपशीलाची एक प्रत आहे ज्यामध्ये 13 दृश्ये कापली गेली आहेत. यामध्ये पीएम मोदींच्या भाषणापासून ते कोरोना काळापर्यंतची तुलना स्वातंत्र्याच्या काळाशी करण्यात आली होती, या सर्वांचा उल्लेख आहे.

स्वरा भास्कर नेहमी तिच्या परखड वक्तव्यसाठी ओळखली जाते. नुकतच तिनं कॉग्रेस नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या मुद्यावरही तिचं मतं व्यक्त केलं. ज्याची बरिच चर्चा रंगली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

Pune: पुण्यातील शाळेत तंत्रज्ञान शिक्षणाला चालना मिळणार; प्राथमिक विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे धडे

Devendra Fadnavis Virar : "वसई-विरारमधील एकाही गरिबाचे घर तोडू देणार नाही"; देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन!

Pune Election Bribery : पुण्यात संक्रांतीच्या नावाखाली मतांची खरेदी; प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी!

SCROLL FOR NEXT