Swara Bhasker birthday special story her controversial statements  sakal
मनोरंजन

Swara Bhasker: द्रौपदीचं वस्त्रहरण ते पाकिस्तान प्रेम.. स्वराच्या 'या' विधानांनी उडवली होती खळबळ..

आज अभिनेत्री स्वरा भास्करचा वाढदिवस.. त्या निमित्ताने जाणून घ्या ही खास बात..

नीलेश अडसूळ

Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्कर आणि वाद हे मोठं समीकरण आहे. स्वरा काही बोलली आणि त्यावर चर्चा नाही झाली असं क्वचितच होतं. त्यामुळे ती सतत वादात अडकणारी अभिनेत्री आहे.

काही दिवसांपूर्वीच ती लग्नबंधनात अडकली. तिनं समाजवादी पार्टीच्या एका नेत्याशी लग्न केले आहे. त्यामुळे तिच्या लग्नाची बरीच चर्चा झाली. ती एक अत्यंत गुणीअभिनेत्री आहे. विषयाची निवड, तिचा अभिनय हा सगळ्याचीच एक उत्तम छाप ती प्रेक्षकांच्या मनावर सोडते.

अशा चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस. आज ती आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया अशी स्वराची कोणती विधानं आहेत, ज्यामुळे खळबळ उडाली होती..

(Swara Bhasker birthday special story her controversial statements )

फार दूर जायची गरज नाही, अगदी चार दिवसांपूर्वीच स्वराच्या एका ट्विटनं चर्चेला उधाण आलं होतं. भारत का राहायच? असा थेट सवाल तिनं केला होता. एक ट्विट करत स्वरा म्हणाली होती, ''यापूर्वी म्हटले होते की, तुम्ही तुमची सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवत या देशात राहणे म्हणजे दरवेळी एका निराशाजनक परिस्थितीला सामोरं जाण्यासारखे आहे. अशा देशात राहणे किती अवघड आहे..'' असं स्वरा म्हणाली होती.

काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये स्वराने द्रौपदीच्या वस्त्रहरणाची तुलना चक्क हिजाब वादाशी केली होती. त्यात तिने लिहिले की, “महाभारतात द्रौपदीचे वस्त्र बळजबरीने काढण्यात आले होते आणि सभेत बसलेले जबाबदार, सत्ताधारी , कायदा करणारे फक्त बघत बसले… आज त्याची आठवण झाली.” तिने हिजाब प्रकरणाविषयी सहानुभूती दाखवत शासनकर्त्यांवर टिका केली होती.

एवढेच नाही तर 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, या अभिनेत्रीने पाकिस्तानची निंदा केली होती.पण २०१५ मध्ये जेव्हा तिने पाकिस्तानला भेट दिली तेव्हा ती म्हणाली होती की तिने आतापर्यंत भेट दिलेला हा सर्वोत्तम देश आहे आणि तिथल्या मुलाखतींमध्ये तिचे कौतुक गेले केले. तिच्या या वादग्रस्त टिप्पण्यांनी सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

कॉंट्रोव्हरसिज वगळता स्वरा चित्रपटांतील अभिनयात अनेकांना मागे टाकते यात काहीच शंका नाही.'रांझना' मधील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. 'तनु वेड्स मनू' आणि 'प्रेम रतन धन पायो' या २०१५ मधील सर्वाधिक कमाई करणार्बॉरे बॉलीवूड चित्रपट होते त्यात स्वराचा अभिनय होताच त्याचबरोबर तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (समीक्षक) स्क्रीन अवॉर्ड जिंकला आहे.



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update:'मुळशीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस'; धरण ९९ टक्‍के भरले, आत्तापर्यंत एकुण ७४२८ मिमी पाऊस

Pune Rain Update:'भोर तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस'; वरंधा घाटातील महाड हद्दीत दरड कोसळली, वाहतूक बंद

Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' 10 खास गोष्टी, घरात पसरेल आनंदाची लाट

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT