Swara Bhasker esakal
मनोरंजन

Swara Bhasker: भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाली स्वरा भास्कर; सरकारवर टीका करत म्हणाली, "आमच्या देवांची नावं घेऊन..."

Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्कर देखील भारत जोडो न्याय यात्रेत सामील झाली. यावेळी ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वरा भास्करनं (Swara Bhasker) राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे.

priyanka kulkarni

Swara Bhasker: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये (Bharat Jodo Nyay Yatra) अनेकांनी सहभाग घेतला. अभिनेत्री स्वरा भास्कर देखील या यात्रेमध्ये सामील झाली. यावेळी ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वरा भास्करनं (Swara Bhasker) राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे. तसेच स्वरानं सरकारवर यावेळी टीका देखील केली आहे.

काय म्हणाली स्वरा?

स्वरा भास्करनं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, "राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दोन भारत जोडो यात्रा कौतुकास्पद आहेत. लोकांच्या मनात काय आहे ते ऐकण्यासाठी देशात राहुल गांधी फिरले, असं करणारा एकही राजकारणी तुम्हाला सापडणार नाही, राहुल गांधी हे लोकांच्या मनातील गोष्टी जाणून घेत आहे, पण काही नेते स्वत:च्या मनातील गोष्टी आपल्याला सांगतात."

"ज्या भारतामध्ये आपण मोठे झालो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. मात्र आपल्यात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सत्तेत एक विशेष प्रकारचे राजकारण आहे जे द्वेषाचे राजकारण आहे. आपल्या देवांचे नाव घेऊन द्वेष पसरवला जात आहे, हिंदू असल्याने मला समजते की, आपल्या देवांची नावं घेऊन हत्या करण्याचं पाप केलं जात आहे.", असं म्हणत स्वरानं सरकारवर निशाणा साधला आहे.

पाहा व्हिडीओ

डिसेंबर 2022 मध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत देखील स्वरा सामील झाली होती. या यात्रेतील फोटो सोशल मीडियावर शेअर करुन स्वरानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "आज भारत जोडो यात्रेत सामील झाले आणि राहुल गांधी यांच्यासोबत चालले. त्यांची ऊर्जा, वचनबद्धता आणि प्रेम हे प्रेरणादायी आहे! यात्रेत सामान्य लोकांचा सहभाग आणि कळकळ, काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह आणि राहुल गांधी यांची सर्वांसाठी असणारी काळजी या सर्वच गोष्ट थक्क करणाऱ्या आहेत!"

स्वराचे चित्रपट

तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वरा प्रेक्षकांच्या भेटीला आली. स्वराच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return: वेलकम शुभांशु! अंतराळात तिरंगा फडकवून पृथ्वीवर परतले शुभांशु शुक्ला, कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर केलं लँडिंग

Mumbai Rain: मुंबईत जोरदार पाऊस! अनेक भागात पाणी साचले, विमानांचे वेळापत्रक बिघडले अन्...; जाणून घ्या स्थिती

Crime News: धावत्या बसमध्ये प्रसूती; नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची अमानुष घटना

Mumbai News: मुंबईतील २० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याची चौकशी करा, भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

Shubhanshu Shukla Return Live : अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

SCROLL FOR NEXT