tapsee 
मनोरंजन

पंतप्रधानांच्या लाईट बंद ठेवण्याच्या आवाहनावर तापसी पन्नूची प्रतिक्रिया, नेटक-यांनी केलं ट्रोल..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- दक्षिण भारतीय सिनेमांनंतर बॉलीवूडमध्ये एंट्री घेऊन नावारुपाला आलेली अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मिडीयावर चांगलीच ऍक्टीव्ह असते..आता तर तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनवर तिची प्रतिक्रिया दिली आहे..या प्रतिक्रियेमुळे तिला ट्रोलर्सचा सामन करावा लागत आहे..काल ३ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रविवार रोजी रात्री ९ वाजता देशातील नागरिकांना घरातले लाईट बंद ठेवण्याचं आवाहान केलं आहे..तसंच दिवे, मेणबत्ती किंवा इतर कशाद्वारेही ९ मिनिटं प्रकाश करण्याचं आवाहन केलं आहे..

अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या ट्वीटर अकाऊंटवरुन ट्वीट करत असं लिहिलं आहे की, 'आता हे नवीन टास्क आलं आहे..yay yay yay..' असं ट्वीट तापसीने केलं आहे..तिच्या या ट्वीटवर काही क्षणातंच हजारोंच्या संख्येने कमेंट्स आल्या आहेत..यातील जास्तीत जास्त कमेंट्स या तिला ट्रोल करणा-.या आहेत..

तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंदेलने पंतप्रधानांच्या या आवाहनाचं स्वागत केलं आहे..ती म्हणतेय, की 'पंतप्रधानांच्या या निर्णामुळे मी आनंदी आहे..पंतप्रधान आपल्या भावनांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करत आहेत..आणि आपल्याला हे सगळ्याप्रकारे व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत..' तसंच तिने केलेल्या या ट्वीटमध्ये शेवटी 'जय श्री राम' असं देखील म्हटलं आहे..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 3 एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता देशातील नागरिकांना व्हिडिओद्वारे एक मेसेज दिला आहे..या मेसेजमधून त्यांनी रविवार ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील सर्व लाईट्स बंद करायच्या आहेत आणि लाईट बंद करुन दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे..याआधी पंतप्रधान मोदी यांनी २२ मार्चला जनता कर्फ्यु घोषित केला होता..त्यासोबतंच त्यांनी संध्याकाळी ५ वाजता ५ मिनिटे कोरोना योद्धांसाठी टाळी, घंटा आणि शंखनाद करण्याचं आवाहन केलं होतं..  

taapsee pannu reacts to pm modi appeal to keep the lights off  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT