tapasee 
मनोरंजन

‘रश्मी रॉकेट’मधील धावपटूच्या भूमिकेतील फर्स्ट लूक तापसीने केला रिलीज

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या सिनेमातील भूमिकेसाठी तयारी करतेय. नुकताच तिने रश्मी रॉकेट' या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

आकाश खुराना दिग्दर्शित 'रश्मी रॉकेट' या सिनेमात तापसी एका धावपटूची भूमिका साकारतेय. सध्या दुबईत या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. या भूमिकेसाठी तापसी खूप मेहनत घेत असून सेटवरही तिच्यासोबत पाच आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ट्रॅक ट्रेनर, ऍथलेटिक्स कोच आणि जिम ट्रेनर अशी टीम असते. या फर्स्ट लूकमध्ये तापसी रनिंग ट्रॅकवर पाठमोरी उभी आहे. आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणाऱ्या एका धावपटूची भूमिका ती साकारतेय.

तापसीच्या हातात सध्या बरेच प्रोजेक्ट्स असून नुकतंच तिने आनंद एल राय दिग्दर्शित ‘हसीन दिलरुबा’ या रोमॅण्टिक थ्रिलर सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलंय. त्यानंतर ती ‘लूप लपेटा’, ‘रन लोला रन’ या सिनेमांमध्येही झळकणार आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’ या सिनेमातील तिच्या भूमिकेचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं होतं. तेव्हापासून प्रेक्षक तिच्या आगामी सिनेमाची वाट पाहत होते. 

taapsee pannu shares first look from rashmi rocket  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Municipal : इचलकरंजीच्या राजकारणात मोठा बदल; महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह गायब

India Squad for T20 World Cup 2026: संजू-अभिषेक ओपनिंगला, रिंकू सिंग फिनिशर; वर्ल्ड कपसाठी भारताची तगडी Playing XI, थरथर कापतील प्रतिस्पर्धी...

झी मराठीची मोठी घोषणा! पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार वाहिनीवरील दोन गाजलेल्या मालिका; वाचा तारीख आणि वेळ

नवीन वर्षात स्लिम व्हायचं स्वप्न? वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या 10 गोल्डन टिप्स

Nashik Municipal Election : भाजपचा 'मिशन १०० प्लस'चा प्लॅन; नाशिकमध्ये उमेदवारीसाठी आता त्रिस्तरीय सर्वेक्षण सुरू!

SCROLL FOR NEXT