jennifer 
मनोरंजन

‘तारक मेहता’मधील 'या' अभिनेत्रीचं इन्स्टा अकाउंट हॅक

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध कॉमेडी मालिकेत रोशन सोधी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री जेनीफर मिस्त्री हिचं इन्स्ट्राग्राम अकाउंट हॅक झालं आहे. याबाबत तिने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान अभिनेत्री अंबिका रंजनकर हिने जेनीफरचं अकाउंट हॅक झाल्याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे.

“जेनीफरचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. जर कुठल्या अज्ञात अकाउंटवरुन तुम्हाला मेसेज किंवा रिक्वेस्ट आली तर त्याकडे दुर्लक्ष करा. जेनीफर आपलं अकाउंट पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी चाहत्यांना विनंती करतेय की त्यांनी देखील देवाकडे प्रार्थना करावी.” अशी इन्स्टाग्राम पोस्ट लिहून अंबिकानं हॅकर्सपासून सावधान राहण्याचा सल्ला प्रेक्षकांना दिला आहे. तिची ही पोस्ट सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

अंबिका रंजनकर ही तारक मेहता मालिकेत कोमल हाथी ही व्यक्तिरेखा साकारते. आपल्या हटके अभिनय शैलीच्या जोरावर गेली १२ वर्ष ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अंबिका सोशल मीडियावर देखील चांगलीच ऍक्टीव्ह असते. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिने मालिकेतील कोस्टार जेनीफरच्या वतीनं चाहत्यांशी संपर्क साधला.

taarak mehta ka ooltah chashmah actress jennifer mistry bansiwal instagram account gets hacked  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market मध्ये नुकसान झालं नाशिकच्या दोन पठ्ठ्यांनी असा मार्ग निवडला की पोलिसांनीही डोक्याला हात मारला; नेमकं काय घडलं?

Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक वाढ, चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Asia Cup 2025 Super Four Scenario: बांगलादेशच्या विजयाने सुपर ४ ची स्पर्धा रोमांचक वळणावर; ३ जागांसाठी ५ संघांमध्ये चुरस... पाकिस्तानचा फैसला आजच

Share Market : भारतीय शेअर बाजाराची तेजीने सुरुवात; सेन्सेक्सने ओलांडला ८२६०० चा टप्पा, निफ्टीतही ७८ अंकांची वाढ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा पगार ऐकून थक्क व्हाल; पगाराशिवाय आणखी काय मिळतं त्यांना? जाणून घ्या सुविधा आणि एकूण संपत्ती

SCROLL FOR NEXT