Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Asit Modi confirms Dayaben's entry soon Google
मनोरंजन

तारक मेहता...: 'दिशा वकानी नाहीच,पण दयाबेन दिसणार'; निर्माते म्हणाले...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून दिशा वकानीनं ब्रेक घेतल्यानंतर दयाबेनही गेली ५ वर्ष मालिकेत दिसली नव्हती.

प्रणाली मोरे

'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta ka Ooltah Chashmah) या प्रसिद्ध मालिकेत गेल्या अनेक दिवसांत बऱ्याच चर्चेतल्या घडामोडी होताना दिसत आहेत. अनेक कलाकार शो सोडून चाललेयत,तर नवीन कलाकार त्या जागी येत आहेत अशा बातम्या कानावर पडत आहेत. त्यातच आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये दाखवलं गेलं आहे की दयाबेन ही मालिकेतील प्रसिद्ध व्यक्तिरेखा परत येतेय. अर्थात दिशा वकानीनं(Disha Vakani) आपल्या अभिनयानं ही दयाबेन घराघरात पोहोचवली होती. मग काही कारणानं तीन गेली काही वर्ष ब्रेक घेतला होता,पण त्यानंतर निर्मात्यांनी सुद्धा दुसऱ्या कुणा दयाबेनला(Dayaben) मालिकेत आणणं उचित समजलं नव्हतं. पण आता दयाबेन परत येत असल्यानं चाहते मात्र खूश आहेत. दिशा वकानी पुन्हा दयाबेन म्हणून मालिकेत दिसणार असा चर्चेचा सुरु उमटू लागला आहे. पण,दिशाच्या चाहत्यांसाठी मात्र मन खट्टू करणारी बातमी आहे बरं का. तारक मेहताचे निर्माते असित मोदी(Asit Modi) यांनी सांगितलं आहे की दयाबेन ही व्यक्तिरेखा आता नवी अभिनेत्री साकारणार आहे.(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Asit Modi confirms Dayaben's entry soon)

एका इंग्रजी वेबसाईटशी बातचीत करताना असित मोदी म्हणाले आहेत,''दयाबेन ही व्यक्तिरेखा मालिकेत पुन्हा परततेय पण दिशा वकानी याला साकारणार नाही. दिशाच्या जागी आम्ही दुसरी अभिनेत्री घेत आहोत. त्यासाठी ऑडिशन सुरु आहेत. आणि लवकरच आम्हाला नवी अभिनेत्री दयाबेन साकारण्यासाठी मिळेल''. दिशा वकानीच्या जागी नवी अभिनेत्री जी दयाबेन साकारेल तिला शोधायला पाच वर्ष का लागली यावर असित मोदी म्हणाले,''लग्नानंतर दिशा वकानीनं मालिकेत काही काळ काम केलं. त्यानंतर मुलाच्या देखभालीसाठी तिनं ब्रेक घेतला होता पण तिनं शो सोडला नव्हता''.

असित मोदी पुढे म्हणाले,''आम्हाला आशा होती की दिशा परत येईल,पणं नंतर कोरोनानं हैदोस मांडला. शूटिंग करताना खूप निर्बंध होते. आम्ही सगळेच काळजी घेत होतो पण दिशा म्हणाली की तिला कोरोनाच्या भीतीमुळं शूटिंगला येऊन पुन्हा काम सुरू करण्यास भीती वाटत आहे. तिचे शो शी खूप जुनं नातं होतं आणि आमच्या सर्वांशी देखील. त्यामुळे आम्ही सर्वांनी एकमताने ठरवलं की तिचं मन शूटिंगसाठी पूर्पणे तयार होईपर्यंत आपण वाट पहायची. आज पण तिनं शो सोडला असं म्हटलेलं नाही. ती आमच्या तारक मेहता कुटुंबाच्या सदस्या सारखीच आहे''.

असित मोदी दिशाविषयी माहिती देताना पुढे म्हणाले, ''दिशा पुन्हा दुसऱ्यांदा आई बनली आहे. अशामध्ये ती शो मध्ये पुन्हा काम करणं तिला शक्य होणार नाही. त्यामुळे आता नव्या दयाबेनसाठी ऑडिशनची प्रोसेस जलद गतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच नवीन अभिनेत्रीवर शिक्कामोर्तब होईल, आणि चाहत्यांना नवीन अभिनेत्रीविषयी देखील लगेच कळेल. आम्ही देखील मालिकेच्या आमच्या प्रेक्षकांना यासंदर्भात अपडेट देतच राहू''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT