Taarak Mehta ka Ooltah Chashmah  Esakal
मनोरंजन

Taarak Mehta ka Ooltah Chashmah मालिकेवर येतोय सिनेमा.. कोण असणार जेठालाल आणि दयाबेन..काय म्हणाले निर्माते?

मालिकाविश्वात १५ वर्ष यशस्वी राज्य केल्यानंतर 'तारक मेहता..' मालिकेशी संबंधित गेम आणि लहान मुलांसाठी राइम्स हे याआधीच भेटीस आले आहेत.

प्रणाली मोरे

Taarak Mehta ka Ooltah Chashmah: छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेली १५ वर्ष प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या वर्षात मालिकेच्या निर्मात्यांनी याची कार्टुन सीरिज लॉंच केली होती,ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. लोकांनी मनमोकळेपणाने ही सीरिज एन्जॉय केली होती.

यानंतर गेल्याच महिन्यात निर्मात्यांनी लहान मुलांसाठी मालिकेशी संबंधित राइम्स लॉंच केली होती. निर्माते असित कुमार मोदी यांनी मालिकेशी संबंधित गेमिंग सीरिज लॉंच केली होती. ज्याचं नाव होतं 'रन जेठा रन'.

तर अलिकडेच या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी मुलाखतीत सांगितलं की, 'तारक मेहता का उल्टा चष्मा युनिव्हर्स'ची त्यांना निर्मिती करायची आहे.

असित कुमार मोदी म्हणाले, लोकांना तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका खूप आवडते. १५ वर्ष झाली आहेत आणि आजही लोक या मालिकेला लोक तितकेच पसंत करतात. लोक आजच्या काळात मालिका फक्त टी.व्ही वरच नाहीत तर ओटीटी,युट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्मवरही पाहतात. लोकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळतोय की मला शो मधील प्रसिद्ध झालेल्या व्यक्तिरेखांना घेऊन काहीतरी वेगळं करायची इच्छा मनात आली आहे. आज जेठालाल,बबीता.दयाबेन,सोढी आणि इतरही व्यक्तिरेखा घराघरात प्रसिद्ध झाल्या आहेत. सगळे लोकही या सगळ्यांना आपल्याच घराचा भाग समजू लागले आहेत. १५ वर्षात प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आता मालिकेचं रुपांतर मला मोठ्या स्केलवर करायचं आहे,त्याचा विचार मी सध्या करतोय.

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

''मी विचार केला की लोक या व्यक्तिरेखांना इतकं पसंत करतात तर मग याच्यावर गेम का नाही बनवावा? लोक ट्रॅव्हल करत ऑफिसच्या फ्री टाईममध्ये कधीही हा गेम खेळू शकतात. असंच मला प्रत्येक वयोगटासाठी या मालिकेशी संबंधित काही ना काही बनवायच्या कल्पना मनात आल्या''.

'' मला वाटतं की या मालिकेशी प्रत्येक वयोगटातील लोक कनेक्ट करतात. अशामध्ये प्रत्येकासाठी काहीतरी बनवता आलं तर माझं भाग्य समजेन मी. लवकरच आम्ही 'पोपटलाल की शादी' आणि 'दयाबेन' वर देखील गेम घेऊन येत आहोत''.

असित कुमार मोदीला विचारलं गेलं,'त्यांनी गेमिंगच्या विश्वात पाऊल ठेवलं आहे तर मग ते आपल्या मालिकेचं रुपांतर सिनेमातही करणार का?'

तेव्हा ते म्हणाले,'' हो, या मालिकेवर मी सिनेमा बनवणार आहे. हा एक अॅनिमेटेड सिनेमा आहे. यामध्ये खूप काही मसाला असेल जो लोकांना नक्की आवडेल. मालिकेतील संबंधित जेठालाल,दयाबेन या व्यक्तिरेखा लोकांना पुन्हा आकर्षित करतील''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT