Tahira Kashyap tells Shilpa Shetty about her sex life with Ayushmann Khurrana Google
मनोरंजन

आयुषमान खुरानाची पत्नी म्हणते,'आमच्यासाठी सेक्स एक चांगला वर्कआऊट आहे'

लेखिका-दिग्दर्शिका म्हणून बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या ताहिरा कश्यपनं शिल्पा शेट्टी होस्ट करत असलेल्या शो मध्ये आपल्या सेक्स लाईफविषयी काही बिनधास्त वक्तव्य केली आहेत

प्रणाली मोरे

ताहिरा कश्यप(Tahira Kashyap) म्हणजे बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुरानाची(Ayushmann Khurrana) बायको. तिनं नुकतंच शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) होस्ट करत असलेल्या शो मध्ये हजेरी लावलेली असताना आपल्या सेक्स लाईफ(Sex Life) विषयी काही बिनधास्त वक्तव्य केली आहेत. ताहिरा कश्यप ही एक लेखिका-दिग्दर्शिका म्हणूनही बॉलीवूडमध्ये काम करते. अर्थात ही तिची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. तिनं आपल्या पुस्तकामध्ये आई झाल्यानंतर बदलेल्या आयुष्यावर काही मुद्दे मांडले आहेते,जे नेमके शिल्पानं तिला विचारले अन् ताहिरानं जे काही उत्तर शो मध्ये दिलं त्यानंतर शिल्पासोबत सगळेच 'आ' वासून पाहत राहिले.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) सध्या 'शेप ऑफ यू'(Shape Of You) एका चॅट शो मध्ये होस्ट म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. हा शो पूर्णपणे शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर आधारित आहे. शो मध्ये येणाऱ्या गेस्ट सोबत शिल्पा यासंदर्भातच बातचीत करताना दिसते. नुकतंच या शो मध्ये गेस्ट म्हणून अभिनेता आयुषमान खुरानाची बायको ताहिरा कश्यप सहभागी झाली होती. यावेळी तिनं कितीतरी विषयांवर,समस्यांवर संवाद साधला. पण अचानक शो मध्ये ट्वीस्ट आला जेव्हा तिनं सेक्स लाईफ वर एकदम मोकळेपणाने बिनधास्त काही वक्तव्य केली अन् स्वतःच्या सेक्स लाईफ विषयीही खुलासे केले. ताहिरानं सेक्स आतापर्यंतचा सर्वात बेस्ट वर्कआऊट म्हटलं आहे. एवढंच नाही तर सेक्स सगळ्यात उत्तम वर्कआऊट कसा ठरु शकतो याविषयीही तिनं विस्तारीतपणे सांगितलं आहे.

बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप हे कपल बॉलीवूडच्या चर्चित कपलपैकी एक. चाहत्यांचीही ही जोडी फेव्हरेट आहे. आयुषमान आणि ताहिरामधलं बॉन्डिंग खूप खास आहे हे अनेकदा त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं की लक्षात येतं. ताहिराचा स्वभाव खूप बिनधास्त असा आहे. ती आपले मुद्दे खूप स्पष्ट मांडताना अनेकदा दिसते आणि ते मांडताना ती कोणताही संकोच बाळगत नाही. शिल्पा शेट्टीच्या नव्या चॅट शो मध्ये म्हणजेच 'शेप ऑफ यू' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये ताहिरानं आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठे खुलासे केले आहेत,जे ऐकल्यावर शिल्पा शेट्टी देखील अवाक झाली होती.

या शो मध्ये शिल्पा शेट्टीनं ताहिराशी तिच्या नुकत्याचा प्रदर्शित झालेल्या 'द 7 सिन्स ऑफ बीइंग ए मदर' या पुस्तकात लिहिलेल्या सेक्स या विषयाला छेडलं. त्यावर उत्तर देताना ताहिरा म्हणाली, ''हे सेक्स आहे आणि हा अनुभव खूप छान असतो,मग का नाही बोलायचं यावर''. ताहिरानं चक्क सेक्स हा एक चांगला वर्कआऊट आहे,ज्यानं कॅलरी बर्न होतात इतपत आपलं मत स्पष्ट मांडलं आहे. अगदी तिच्या आणि आयुषमान खुराना च्या सेक्स लाइफविषयी सांगताना ती म्हणाली,''आम्हाला सेक्स करताना खूप कॅलरी खर्ची कराव्या लागतात''.

यासोबतच ताहिरानं नवरा आयुषमान खुरानाची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी,लाइफ स्टाईलमध्ये झालेला बदल, त्यानं कमावलेले अॅब्ज अशा एकंदरीत सगळ्याच गोष्टींवर संवाद साधला. आयुषमान आपल्याला 'चंदिगढ करे आशिकी'मध्ये दिसला होता. आयुषमाननं बॉलीवूडमध्ये १० वर्ष पूर्ण केली आहेत. तर 'अनेक','डॉक्टर जी','अॅक्शन हिरो' सारखे तीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर ताहिरानं नेटफ्लिक्सच्या 'आय फिल लाइक इश्क' या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आपल्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT