Tamannaah Bhatia Esakal
मनोरंजन

Tamannaah-Vijay: 'हा कबुल है!'... अखेर तमन्नानं विजयसोबतच्या नात्याला दिलं नाव...

Vaishali Patil

गेल्या काही दिवसांपासुन मनोरंजन विश्वात बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या डेंटिगच्या बातम्या वाऱ्या सारख्या पसरल्या. या दोघांना बऱ्याच वेळासोबत स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर त्याच्या नात्याची चर्चा होऊ लागली.

मात्र दोघीही कालारांनी याबाबत बोलण टाळल होतं. ना तमन्नाने याबद्दल पृष्टी केली ना विजयने. मात्र विजयच्या दहाड सिरिजच्या प्रमोशन दरम्यान सोनाक्षी आणि इतर कलाकारांनी विजला तमन्नाच्या नावाने चिडवल्याने या अफवांना आणखीच उधाण आलं होतं.

मात्र आता तमन्ना भाटियाने आता तिच्या नात्यावर शिक्कामोर्तब करत विजय वर्मासोबतच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. तिला विजयबद्दल विचारल्यावर तिनं तिच्या उत्तरानंच सगळं काही सांगितलं.

तमन्नाने एका मुलाखतीत विजय वर्मासोबतच्या नात्याची घोषणा केली होती. यासोबतच त्यांनी विजयसाठी असे काही बोलले की त्यांचे वक्तव्य काही मिनिटांतच व्हायरल झाले.

फिल्म कंपेनियनला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना भाटियाने डेटिंगबद्दल खुलासा केला आहे. तमन्ना म्हणाली, 'मला वाटत नाही की तुम्ही फक्त त्यांच्यासोबत काम केल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होतात. एखाद्यासाठी काहीतरी वाटण्याची भावना वेगळी असते. त्यामुळेच एकत्र काम करण्याचं काही कारण असू शकतं, असं मला वाटत नाही.

तमन्ना म्हणाली की, 'होय, विजय अशी व्यक्ती आहे जिच्यासोबत मी पुढे काही प्लॅनिंग करू शकते. माझा त्याच्यासोबतचा संबंध खूप खास आहे. तो अशी व्यक्ती आहे ज्याची मी काळजी घेते आणि हो, तो या क्षणी माझं आनंदाच ठिकाण आहे. होय, ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे. म्हणजे आम्ही एकमेकांच्या जवळ कसे आलो.

तमन्ना पुढे म्हणते की, 'भारतात अशीही एक समस्या आहे की एका मुलीला जोडीदारासाठी तिचे संपूर्ण आयुष्य बदलावे लागते. त्या माणसासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. पण तो तसा नाही. त्याला माझे जीवन आणि गोष्टी पूर्णपणे समजतात.

तमन्ना आणि विजय वर्मा पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत . 'लस्ट स्टोरीज 2' नावाची ही वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन आर बाल्की, कोंकणा सेन शर्मा, सुजॉय घोष आणि अमित शर्मा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT