tamannah bhatia talks about experience of watching intimate scene with family lust stories 2  SAKAL
मनोरंजन

Lust Stories 2: फॅमिलीसोबत 'तसे' सिन बघणं म्हणजे.. तमन्नाने शेअर केला अनुभव Tamannah Bhatia

तमन्ना आणि विजय यांचे इंटिमेट सिन लस्ट स्टोरीज २ मध्ये दिसत आहेत

Devendra Jadhav

Lust Stories 2 Tamannah Bhatia News: अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्माची भूमिका असलेला लस्ट स्टोरीज २ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. तमन्ना आणि विजय यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगत असतानाच हे दोघे एकत्र लस्ट स्टोरीज २ मध्ये झळकत आहेत.

तमन्ना आणि विजय यांचे इंटिमेट सिन लस्ट स्टोरीज २ मध्ये दिसत आहेत. अशातच तमन्ना या सीरिजच्या निमित्ताने तिच्या आयुष्यातले विविध अनुभव शेअर करत आहे.

(tamannah bhatia talks about experience of watching intimate scene with family lust stories 2)

तमन्नाने न्यूज18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मी अशा कुटुंबातून आले आहे कि कुटुंबासोबत असे सिन बघताना अवघडल्यासारखे होते.

असे सिन समोर दिसल्यावर मी आजूबाजूला पाहणे सुरू करेन, मी अस्वस्थ होऊ लागेन. याच गोष्टीमुळे मी आजवरच्या माझ्या करिअरमध्ये कोणासोबत असे सिन दिले नाहीत."

तमन्ना पुढे लिहिते, “म्हणून, माझ्यासाठी, मोठ्या प्रेक्षकांची गरज भागवणारी अभिनेत्री होण्यापासून असं काहीतरी करणं हि एक विचित्र गोष्ट होती. आता प्रेक्षकांच्या अशा सीन्सची गरज नाही. हा भ्रम माझ्यासाठी आता तुटला आहे.

म्हणून मी एक कलाकार म्हणून स्वतःला शोधण्यात आणि विविध भूमिका आणि व्यक्तिरेखांमध्ये काम करण्याचा आनंद घेत आहे,” असं तमन्ना म्हणाली.

काही काळापासून विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांची नावे एकत्र जोडली जात आहेत. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे डेटिंगच्या अफवांना उधाण आले.

यंदाच्या व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने विजय वर्माने असाच एक फोटो शेअर केला होता, ज्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जरी अभिनेत्याने फोटोत कोणालाही टॅग केले नाही.

पण अलीकडच्या काळात प्रमोशन असो कि इव्हेंटमध्ये एकत्र फिरणं असो, तमन्ना आणि विजय त्यांच्या नात्याचा खुल्लेआम स्वीकार करताना दिसत आहेत.

इतकंच नव्हे, तर विजय सोबत लस्ट स्टोरीज २ मध्ये किसिंग सिन करण्यासाठी तमन्नाने तिचा अनेक वर्षांपासूनचा नियम मोडीत काढला. आणि पहिल्यांदाच तिने इंटिमेट सिन दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT