Tanhaji movie tax free in Maharashtra
Tanhaji movie tax free in Maharashtra  
मनोरंजन

गुड न्यूज! अखेर महाराष्ट्रात 'तानाजी' टॅक्स फ्री!

वृत्तसंस्था

मुंबई : 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाची हवा सध्या अखंड देशभर आहे. तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपट दाखविला जात आहे. खुशखबर म्हणजे तानाजी रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महराष्ट्र सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री करत प्रेक्षकांना दिलासा दिला आहे. 

शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे शूरवीर मावळे तानाजी मालुसरे यांची महती सांगणारा तानाजी हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. महाराष्ट्रातच जो ऐतिहासिक पराक्रम घडला त्यावरील चित्रपटच राज्यात टॅक्सफ्री होत नव्हता, म्हणून महाराष्ट्र सरकारवर टीकाही झाली होती. पण अखेर महाराष्ट्रात आज हा चित्रपट टॅक्स फ्री झाला. 

हरियाणा, उत्तर प्रदेश या दोन राज्यांनी यापूर्वीच तानाजी टॅक्स फ्री केला होता. त्यामुळे भाजप सरकार असलेल्या राज्यात चित्रपट टॅक्स फ्री होतो, मात्र महाराष्ट्रात अजून का नाही, असा सवाल केला जात होता. हा चित्रपट 3D मध्ये असल्याने तिकीटांची किंमतही खूप जास्त होती. पण आता टॅक्स फ्री झाल्याने सगळ्यांनाच तानाजी बघता येईल.  

'तानाजी : द अनसंग वॉरियर'मध्ये अजय देवगण नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. उदयभानूशी निधड्या छातीने लढणाऱ्या, शिवाजी महाराजांची आज्ञा पाळणाऱ्या आणि पत्नी-मुलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तानाजींचे बलाढ्य रूप मोठ्या पडद्यावर दिसले. सैफ अली खानने साकारलेला उदयभानू दमदार आहे. तर काजोलने तानाजींच्या पत्नींची म्हणजेच सावित्रीबाईंची भूमिका साकारली आहे व शरद केळकर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT