Tapsee Pannu esakal
मनोरंजन

Taapsee Pannu: कोण चुकलं तुम्हीच सांगा? तापसी की फोटोग्राफर्स?

'पापराझी' आणि तापसी पन्नू यांच्यात झालेल्या वादानंतर तापसी भडकली आणि मग काय तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

सकाळ डिजिटल टीम

बहुचर्चित अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या परखड स्वभावामुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. मात्र अलीकडेच एका कार्यक्रमात तापसी पापराझींवर भडकली. कार्यक्रमाला उशिरा पोहोचलेल्या तापसी पन्नूला 'पापराझी' पोज देण्यास थांबवत होते त्यावेळी तिने पापराझींना पोद देण्यास नकार दिला तेव्हा पापराझी आणि तापसी पन्नू यांच्यात झालेल्या वादानंतर तापसी भडकली आणि मग काय तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

अभिनेत्री तापसी पन्नू अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी होताना दिसली होती. तिची छायाचित्रे क्लिक करण्यासाठी पापाराझी मैदानाबाहेर थांबले होते. अभिनेत्री कार्यक्रमस्थळी येताच ती मुख्य कार्यक्रमाच्या दिशेने जाऊ लागली. दरम्यान पापाराझींनी तिला काही चित्रांसाठी थांबण्यास आणि पोझ देण्यास सांगितले. एका फोटोग्राफरने असेही सांगितले की, 'ते तासंतास वाट पाहत आहेत आणि ती कार्यक्रमासाठी उशिरा पोहोचली.'

त्यानंतर अभिनेत्री म्हणाली की, 'तिला कार्यक्रमासाठी उशिर झालाय त्यामुळे तिला आत जावं लागेल ती पोज देऊ शकत नाही.' त्यावर पापराझी म्हणालेत, आम्ही कधीपासून फक्त तुमचीच वाट बघत उभे आहोत. आम्हाला ४.३० वाजेपासून बोलवण्यात आले होते. (Celebrity) पापराझीच्या या उत्तरानं तापसी मात्र भडकली. 'मला बोलवलं गेलं होतं म्हणून मी आली. मला कशाला ऐकवताय. जसं मीच तुम्हाला बोलवलं होतं.' असं म्हणत ती पापराझींवर भडकली.

तापसीनं पापराझींना चांगलंच सुणावलं

माझ्यासोबत व्यवस्थित बोला मग मीही तुमच्यासोबत व्यवस्थित बोलेल,असंही ती म्हणाली. त्यावर पापराझी म्हणाला,आम्ही तुमच्याशी व्यवस्थितच बोलतोय. त्यावर प्रतिउत्तर देत तापली पुन्हा भडकली. जो कॅमेरा माझ्यावर आहे तो तुमच्याकडे फिरवा म्हणजे तुम्ही माझ्याशी कसे बोलताय ते कळेल लोकांना. तापसीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT