tarak mehta ka ulta chashma Sohail Rehmani got angry on Jennifer mistry asit modi allegations
tarak mehta ka ulta chashma Sohail Rehmani got angry on Jennifer mistry asit modi allegations SAKAL
मनोरंजन

TMKOC Asit Modi : तिने असित मोदींना मॅसेज केला आणि.. जेनिफरच्या आरोपांवर मेकर्सचा मोठा गौप्यस्फोट

Devendra Jadhav

Sohail Rehmani on Jenifer Mistry Allegation News: गेल्या अनेक महिन्यांपासून तारक मेहता का उलट चष्मा शो बद्दल निरनिराळे सुरु वाद सुरु आहेत.

तारक मेहता मधील रोशन भाभी म्हणजेच अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने काही दिवसांपूर्वी शोचे निर्माते असित मोदी यांनी माफी मागावी म्हणून मागणी केली होती, त्यामुळे हा वाद आणखी चिघळला होता.

आता होत असलेल्या आरोपांवर तारक मेहता शो चे ऑपरेशन हेड सोहेल रेहमानी यांनी मौन सोडलंय.

(tarak mehta ka ulta chashma Sohail Rehmani got angry on Jennifer's allegations)

तुझ्यावर कोणी जबरदस्ती नव्हती केली

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, सोहेल रहमानीने जेनिफरच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले- 'जेनिफरला शो आणि शोच्या निर्मात्यांसोबत खूप समस्या होत्या.

तसे असेल तर 2016 मध्ये ती पुन्हा शो मध्ये का सहभागी झाली? यासाठी तिला कोणीही जबरदस्ती केली नव्हती. तिने असित भाईला मेसेज केला की- 'मी सुधारले आहे. सर मला एक संधी द्या.'

नियमांचे पालन करावे लागेल

सोहेल पुढे म्हणाला की- 'मला कळतच नाहीये की तिला माझ्याबद्दल इतक्या समस्या का आहेत ? मी फक्त माझे काम करत होतो. वैयक्तिक कारणास्तव तिने न सांगता शो सोडला होता.

अशा स्थितीत मला जे करायचं होतं ते मी केलं.खरं तर त्या वेळीही ती उद्धटपणे वागली. तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल तर त्याचे काही नियम आहेत.

त्या नियमांचे पालन करावे लागेल. जर तुम्ही उशिरा आलात आणि कंपनीचे कार्य बिघडेल असे काम केले तर तुम्हाला तसं सांगण्यात येईल. तेच तेच पुन्हा पुन्हा व्हायला लागल्याने आम्ही तिला खडसावले. ती करत असलेले आरोप हा पब्लिसिटी स्टंटशिवाय काही नाही.

जेनिफरवर कायदेशीर कारवाई

यादरम्यान रहमानी यांनी असित मोदींच्या विधानाचे समर्थन केले ज्यात त्यांनी अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते.

जेनिफरविरोधात माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत, मी पोलिसांना आधीच सर्व काही सांगितले आहे, असे तो म्हणाला. माझे म्हणणे १५ दिवसांपूर्वी नोंदवले गेले.

सीसीटीव्ही फुटेजपासून ते निर्मात्याला पाठवलेले त्याचे मेसेज स्क्रीन शॉट्सपर्यंत, ते सर्व आमच्याकडे आहे. ते म्हणाले की या शोमधून 100 हुन जास्त लोकांची भाकरी अवलंबून आहे.

या गोंधळात मला त्या लोकांचे आर्थिक नुकसान करायचे नाही. जेनिफरने सांगितलेली प्रत्येक गोष्ट निराधार आहे. त्यामुळे आता जेनिफर आणि तारक मेहता मधील मेकर्सचा वाद कोणत्या दिशेला जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ''कोण येतंय कोण नाही, याच्यावर आमचं लक्ष'' मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

India Head Coach : मुहूर्त ठरला तर मग.... गौतम गंभीर 'या' दिवशी सांभाळणार टीम इंडियाच्या कोचचा पदभार, BCCI करणार घोषणा

Latest Marathi News Live Update : जयदत्त क्षीरसागरांच्या मेळाव्याला संदीप क्षीरसागरांच्या वडिलांची उपस्थिती

ChatGPT-5 : OpenAIची मोठी घोषणा! लवकरच तुमच्या भेटीला येतंय ChatGPT-5, जाणून घ्या लाँच अपडेट आणि भन्नाट फीचर्स

एसटी महामंडळाची ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ विशेष मोहीम! विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार एसटी बसचा पास; बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत पास

SCROLL FOR NEXT