'tarak mehta ka ulta chashma' team apologised about lata mangeshkar's song  sakal
मनोरंजन

'तारक मेहता'च्या टीमने मागितली जाहीर माफी.. घडली मोठी चूक..

हिंदीतील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता हा उलटा चश्मा' या मालिकेच्या टीमने चुकीचा संदर्भ दिल्याने नुकतीच जाहीर माफी मागितली.

नीलेश अडसूळ

Tv entertainment news : अवघ्या जगाला वेड लावणारी एक मालिका गेली १५ वर्षे सातत्याने सुरु आहे, ती म्हणजे सब वाहिनीवरील 'तारक मेहता का उलटा चश्मा'. (taarak mehta ka ooltah chashmah) लहान मुलांपासून ते घरातल्या आजी आजोबांपर्यंत प्रत्यकाला भावणारी अशी ही मालिका आहे. कित्येक घरांमध्ये दिवसरात्र हीच मालिका पहिली जाते. राष्ट्रीय एकात्मकता या संकल्पनेतून साकारलेली या मालिकेतील गोकुलधाम सोसायटी (gokuldham society) आता जवळपास अनेकांच्या आयुष्याचा घटक बनली आहे. पण नुकतीच या मालिकेच्या टीमकडून एक मोठी चूक घडली.

'तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. केवळ विनोदच नाही तर अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करणारी ही मालिका आहे. देशांतील विविध धर्माचे, प्रांताचे सण उत्सवही इथं आनंदाने साजरा होतात. या मालिकेतील 'दयाबेन' हे पात्र गेली काही वर्षे नसतानाही ही मालिका अविरत सुरु आहे. पण प्रेक्षकांचे मनोरंजन करताना या मालिकेकडून मोठी चूक झाली आहे. सोमवारी प्रक्षेपित झालेल्या भागात लता मंगेशकर यांच्या गाण्याबाबत चुकीचा संदर्भ देण्यात आला. चाहत्यांनी ही चूक निर्मात्यांच्या लक्षात आणून दिल्यांनतर मालिकेच्या टीमने चाहत्यांची माफी मागितली.

सोमवारी प्रसारित झालेल्या भागात गोकुळधाममधील सर्व सदस्य सोसायटीच्या क्लबमध्ये एकत्र जमलेले असतात. यावेळी जुन्या काळातील गाणी ऐकत त्यावर गप्पा गोष्टी सुरु असतात. अशात लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचं ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं सुरु होतं. या गाण्यावर बोलताना मिस्टर भिडे म्हणतात, हे गाणं १९६५ मध्ये प्रदर्शित झालं होतं . हे गाणं ऐकून त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचेही डोळे पाणावले होते.'

इथेच मोठी चूक घडली. या गाण्याच्या प्रदर्शनाची चुकीची तारीख मालिकेत सांगितली गेली. त्यामुळे सोशल मीडियावर मालिकेला बरेच ट्रोल केले गेले. त्यानंतर 'तारक मेहता' च्या संपूर्ण टीमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या या चुकीची माफी मागितली आहे. ‘आम्ही आमचे शुभचिंतक, चाहते आणि प्रेक्षक यांची माफी मागू इच्छितो. आजच्या एपिसोडमध्ये आम्ही ‘ए मेरे वतन के लोगों’ गाण्याच्या प्रदर्शनाची तारीख १९६५ असल्याचं म्हटलं होतं. पण हे गाणं २६ जानेवारी १९६३ मध्ये प्रदर्शित झालं होतं. आम्ही आमची चूक मान्य करतो आणि पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेऊ,' अशी ही पोस्ट आहे. पुढे 'तुमचा असित मोदी आणि तारक मेहताची संपूर्ण टीम' असे लिहिले आहे. या मालिकेचे निर्माते असित मोदी आणि संपूर्ण टीमने ही दिलगिरी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्याच्या मुलीला वसतीगृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांकडे कूलरबाबत केलेल्या तक्रारीच्या रागातून कारवाई

Ebola Alert in India: इबोला फैलावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; विमानतळांवर आफ्रिकन प्रवाशांसाठी कडक आरोग्य तपासणी लागू

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील अभंग प्रभू अकॅडमीमधील शिक्षक तेजस शहा याला सीबीआयकडून अटक

Taj Mahal History: ताजमहाल फक्त मुघलांचा की इराणचाही? अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांच्या आग्रा दौऱ्याने उकरून काढला ५०० वर्षे जुना इतिहास

Gokul Election 2026 : महाडिक, मुश्रीफ, कोरे, आबिटकर विरूद्ध सतेज पाटील लढणार गोकुळ निवडणूक?; सात संचालकांचा पाठिंबा, नव्या आघाडीची घोषणा

SCROLL FOR NEXT