Shah Rukh Khan 
मनोरंजन

Jawan Song: जवानच्या 'नॉट रमैय्या वस्तावैया' गाण्याचा टीझर लॉन्च; शाहरुखचा डान्स अन् म्युझिकची जबरदस्त ट्रिट

शाहरुख खानच्या 'जवान' या सिनेमाची सध्या देशभरात हवा आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या सिनेमाची सध्या देशभरात हवा आहे. शाहरुखचे वेगवेगळे लूक आणि साऊथच्या कलाकारांची वर्णी यामुळं या सिनेमाची सध्या जबरदस्त चर्चा सुरु आहे. आता या सिनेमातील नॉट रमैया वस्तावैया या गाण्याचा टीझर स्वतः शाहरुखनंच लॉन्च केला आहे. गाण्याची छोटीशी झलक पाहिल्यानंतर यात शाहरुखचा जबरदस्त डान्स आणि म्युझिकची ट्रिट असणार हे दिसतंय. (Teaser launch of Jawan movie Not Ramaiyya Vastavaiya song great treat of dance and music)

शाहरुख खाननं स्वतः ट्विट करत म्हटलं की, "ठीक आहे मित्रांनो ट्रेलर बनवण्याची वेळ आता आलीए. कारण प्रत्येकाला हेच वाटतंय की टी-सीरीज, अनिरुद्ध आणि अॅटली यामध्ये गाण ठेऊ इच्छित होते. मग आता या गाण्याचा टीझर रिलीज करत आहोत. तसेच या ट्रेलरवर काम करण्यासाठी रुबेनला देखील बोलावण्यात आलं आहे. गाणं आहे, नॉट रमैय्या वस्तवैया. सध्यासाठी अलविदा, तुम्हा सर्वांना प्रेम" (Latest Marathi News)

टीझरमध्ये काय आहे?

गाण्याच्या टीझरमध्ये शाहरुख खान जबरदस्त डान्स करताना दिसतो आहे. संपूर्ण काळ्या कपड्यांमध्ये किंग खान अधिकच हँडसम दिसतोय. टीझरमध्ये जे बोल ऐकायला मिळत आहेत त्यात शाहरुखच्या प्रसिद्ध छैया, छैया या गाण्याचा उल्लेखही आहे. या गाण्यानं नुकतेच २५ वर्षे पूर्ण केली. त्याचबरोबर 'जिंदा बंदा' आणि 'चलेया' ही गाणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत. यानंतर आता हे नवं गाण देखील प्रेक्षकांसाठी खास ठरेल. (Entertainment News in Marathi)

७ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

जवान सिनेमा ७ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. यात शाहरुखसोबत साऊथमधील सुपरस्टार नयनतारा, विजय सेतूपती हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत. तसेच साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अटली जवानचं दिग्दर्शन करणार आहे. असं सांगितलं जात आहे की हा सिनेमा पॅन इंडिया बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी अनेक रेकॉर्ड करु शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinnar Bus Stand Accident Video : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकातच भीषण अपघात; वेगात आलेली बस थेट फलाटवर उभ्या प्रवाशांमध्ये घुसली

Neurologist Tips For Better Sleep: तुम्हालाही झोप येत नाही? न्यूरोलॉजिस्ट सांगतात ‘या’ 3 सवयी बदलल्या तर येईल शांत झोप

StudyRoom Live Sessions: १२ वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू करावी? जाणून घ्या सकाळ+ स्टडीरूमचे खास लाईव्ह सेशनमध्ये

India Post App : रांगेत उभे राहण्याची गरज नाही! डाक विभागाचे 'डाक सेवा २.०' ॲप लॉन्च; सर्व टपाल सेवा आता एका क्लिकवर

Horoscope Prediction : उंदीर, वाघ की डुक्कर ! चायनीज ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास आणि स्वभाव घ्या जाणून

SCROLL FOR NEXT